Manike Mage Hite: श्रीलंकेची प्रसिद्ध गायिका योहानीचं 'मानिके मागे हिते' (Manike Mage Hite) हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. जगभरातील लोक या गाण्याला पसंती देत आहेत. सोशल मीडियावर अनेक जण या गाण्यावर डान्सचे रिल्स तयार करत आहेत. आता लवकरच योहानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे आहे. योहानी भूषण कुमार आणि इंदर कुमार यांच्या 'थॅंक गॉड' या चित्रपटामध्ये गाणे गाणार आहे.
'मानिके मागे हिते' चं हिंदी वर्जन
योहानी तिच्या व्हायरल झालेल्या 'मानिके मागे हिते' या गाण्याचं हिंदी वर्जन थॅंक गॉड या चित्रपटासाठी गाणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. थॅंक गॉड हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. यामध्ये 'मानिके मागे हिते' गाण्याचे देसी वर्जन पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. योहानीच्या या सुपर हिट ट्रॅकला तनिष्क कंपोज करणार आहेत. या हिंदी गाण्याचे लिरिक्स रश्मि विराग यांनी लिहीले आहेत.
दिग्दर्शक इंदर कुमार यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले, 'टॅलेंटेड म्यूजिशियन असणाऱ्या योहानीसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. 'मानिके मागे हिते' या गाण्याचे पहिले देसी वर्जन भारतातील प्रेक्षकांसाठी आम्ही आणत आहोत.' तर योहानीने सांगितले की, 'मला सर्वांचा खूप सपोर्ट मिळाला आहे. मी भूषण कुमार, इंदर कुमार आणि थॅंक गॉड या चित्रपटाच्या संपूर्ण टिमचे आभार मानते. '
PHOTO : श्रीलंकेचं Manike Mage Hite गाणं भारतात हिट, गायिका योहानीवर कौतुकाचा वर्षाव
'मानिके मागे हिते' सोशल मीडियावर व्हायरल
योहानीने गायक-संगीतकार सतीशनसोबत Manike Mage Hite हे गाणं 22 मे रोजी यूट्यूब चॅनेलवर लाँच केलं. हळूहळू हे गाणे सुपरहिट झालं असून केवळ श्रीलंकेतच नव्हे, तर भारतासह इतर देशांमध्येही हे गाणं खूप व्हायरल झाले आहे. युट्यूबवर 30 ऑगस्ट पर्यंत, Manike Mage Hite या गाण्याला YouTube वर 75 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले.