निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींवरील बायोपिक पाहिला, काय म्हणाला विवेक ओबरॉय...
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2019 10:56 AM (IST)
'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली असल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बॉयोपिकच्या संदर्भात झालेल्या गोंधळानंतर सिनेमामध्ये नरेंद्र मोदींची भूमिका करणाऱ्या विवेक ओबरॉय याने निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर विवेक ओबरॉय याने म्हटलं आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाने हा सिनेमा पाहिला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर आयोगाकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. मी सध्या प्रतिक्रिया देऊ शकत नाही मात्र निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर आम्ही खुश आहोत, असे विवेकने म्हटले आहे. तो म्हणाला की, आम्हाला आशा आहे की या सिनेमाच्या प्रदर्शनाला लवकरच मंजुरी मिळेल कारण मोदींच्या या बायोपिकमध्ये कोणताही राजकीय अजेंडा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली असल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता. 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित करणे आचारसंहितेचा भंग ठरेल, असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. याप्रकरणी विरोधकांनी या चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे म्हणत विरोधकांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करु नये, असे आदेश दिले आहेत. विरोधकांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 09 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल का? याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले होते. तसेच कोर्टाने याप्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचेही म्हटले होते. त्यामुळे आज निवडणूक आयोगाला याप्रकरणी निर्णय घ्यावा लागला. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला 'यू' सर्टिफिकेट देत प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला होता. परंतु निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. संबंधित बातम्या