CM Eknath Shinde and DCM Devendra Fadanvis reaction on Salman Khan : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या घरावरील गोळाबाराने वातावरण चांगलच तापलं असल्याचं पाहायला मिळालं. तसेच या घटनेचा संपूर्ण तपास देखील पोलिसांकडून केला जातोय. घराबाहेरील गोळीबारात सलमान खानच्या घरात गोळी घुसल्याची माहिती समोर आली आहे. सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक टीम, पोलीस, मुंबई गुन्हा शाखेकडून तपास सुरु आहे. पोलीस यंत्रणा अलर्टवर आहेत. दरम्यान यावर आता मुख्यमंत्री (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांची (DCM Devendra Fadanvis) देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. 


रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थाना बाहेर गोळीबार झाला. बाईक वरून आलेल्या दोन अज्ञातांनी केलं आणि पळ काढला. सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला. आता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या चार वॉचमनचे जबाब नोंदवले आहेत. 






मुख्यमंत्री शिंदे यांनी काय म्हटलं?


सलमान खानच्या गोळीबारवर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं की, मी सलमान खानसोबत फोनवरुन चर्चा केली आहे. आज पहाटे सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर तणावाचे वातावरण आहे. तसेच मी त्याला सुरक्षेसंदर्भात देखील दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं?


सलमान खान प्रकरणात पोलीस सध्या तपास करत आहेत. त्याची माहिती देखील मिळेल. त्याची माहिती देखील मिळेल आणि ती जेव्हा मिळेल तेव्हा ती दिली जाईल. त्यामुळे अटकलबाज्या करण्यात काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.  


बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय


सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या मागे बिश्नोई गँग असल्याचा संशय मुंबई गुन्हे शाखेला आहे. त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेने त्या दृष्टीने पुढील तपास सुरु केला आहे. बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi) सलमानला धमकी का देत आहे. बिश्नोई गँगने सलमान खानला लक्ष्य करण्यामागचं नेमकं कारण जाणून घ्या.



ही बातमी वाचा : 


ब्रेकिंग! सलमान खानच्या घरात घुसली गोळी, घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज समोर