मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर झालेल्या अंधाधुद गोळीबाराची (Firing) जबाबदारी एका व्यक्तीने स्वीकारली आहे. एका फेसबुक अकाऊंटवरील पोस्टद्वारे या गोळीबाराची सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली असून यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला आहे. अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने आपण या गोळीबारामागे असल्याचं मान्य केलं आहे.
सलमान खानच्या घराबाहेर अंधाधुद गोळीबार
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचा संशय पोलिसांना होता. आता या प्रकरणात एका व्यक्तीने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत यामागे बिश्नोई गँगचा हात असल्याचं म्हटलं आहे. अनमोल बिश्नोई या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून सलमान खान घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
बिश्नोई गँगने स्वीकारली गोळीबाराची जबाबदारी
या गोळीबार प्रकरणात आधीच बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. दरम्यान, अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हे अकाउंट फेसबुक वर सर्च केलं जाऊ शकत नाही. अकाउंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. पोलीस याची सत्यता पडताळून पाहत आहेत.
पोस्टमध्ये काय म्हटलंय?
अनमोल बिश्नोई
ओम. जय श्री राम. जय गुरु भवेश्वर. जय गुरु दयानंद सरस्वती. जय भारत. आम्हाला शांतता हवी आहे, दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून घेतला जात असेल तर युद्ध योग्य आहे. सलमान खान आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केलं आहे. तुला आमची ताकद समजावी यासाठी हे केलं आहे. तुला ही शेवटचा इशारा आहे. यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडणार नाहीत. ज्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला तू देव मानल आहेस. त्यांच्या नावाने आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत. बाकी मला बोलायची सवय नाही.
जय श्री राम
जय भारत
सलाम शाहिदा
(लॉरेन्स बिश्नोई ग्रुप)
गोल्डी ब्रार
रोहित गोदरा
कला जठारी
गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर फायरिंग
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे अंधाधुद गोळीबार झाला. पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञातांनी सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर फायरिंग केली. यावेळी पाच राऊंड फायर करण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमद्ये समोर आलं आहे. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात तणावाचं वातावरण आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :