Ekda Yeun Tar Bagha: एखाद्या गीताची जादू अथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात  असल्याचे आपण बघतो. असंच  एक जोरदार गीत आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) या धमाल चित्रपटातून आपल्या  भेटीला आलं आहे.

  


प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात ‘आली आली गं भागाबाई’ हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादरकेलं आहे. नुकतंच हे गीत प्रदर्शित झालं असून या गीतालाप्रेक्षक पसंतीची पावती मिळाली आहे.  हे गीतरोहन प्रधान यांनी गायलं आहे.  मंदार चोळकर यांच्या गीतलेखनाला रोहन-रोहनयांचं संगीत लाभलं आहे.  या गीतातून  चित्रपटातील सर्व कलाकारांचा ढिंच्याक अंदाजपहायला मिळतोय. या गीताची आणि चित्रपटाच्या कथेची गंमत चित्रपट पाहिल्यानंतरच उलगडेल. चित्रपटाच्या गीताचे राइट्स सारेगमकडे आहेत.  






24  नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदायेऊन तर बघा' या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती,दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपकपेंटर यांचीअसून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायणमूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार,  तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर,  राजेंद्र शिसातकर,  नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर,रोहित माने,सुशील इनामदार आदि चित्रपटसृष्टीती लकसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.


काही  दिवसांपूर्वी प्रसाद खांडेकरनं 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, "माझा लेखक दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. 'एकदा येऊन तर बघा,' या आमच्या नव्या कोऱ्या हॉटेलचे इरसाल चालक आणि मालक यांची ओळख करून द्यायला घेऊन आलो आहोत.हा एकदम फ्रेश आणि खुसखुशीत टीझर!" प्रसाद खांडेकरनं शेअर केलेल्या टीझरला कमेंट करुन अनेकांनी प्रसादला त्याच्या या आगामी चित्रपटाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Ekda Yeun Tar Bagha Teaser Out: नव्या कोऱ्या हॉटेलच्या चालक आणि मालकांची भन्नाट गोष्ट; 'एकदा येऊन तर बघा' चा धमाकेदार टीझर रिलीज!