Elvish Yadav : 'बिग बॉस ओटीटी'चा विजेता (Bigg Boss OTT) एल्विश यादव (Elvish Yadav) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामध्ये (Noida) एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एल्विश यादववर काय आरोप आहेत?
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विषारी सापांच्या तस्करीचे त्याच्यावर आरोप आहेत. नोएडा (Noida) आणि एनसीआरमध्ये (NCR) विषारी सापांचं विष पुरवणारी ड्रग्ज पार्टी आयोजित केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच कारणाने नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एल्विशसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मेनका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या पीएएफ संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो. विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. त्यामुळे पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी सांगितले की, "एका माहितीदाराने एल्विशसोबत संपर्क साधला असता त्याने एजंट राहुलचा नंबर दिला होता. त्यानंकर माहिती देणाऱ्याने राहुलला पार्टी आयोजित करण्यास त्याने सांगितले. या पार्टीमध्येच पोलिसांनी छापा टाकून पाच आरोपींना अटक केली आहे. आता याप्रकरणी एल्विश यादवसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप एल्विशने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
एल्विश यादव कोण आहे? (Who is Elvish Yadav)
एल्विश यादव 'बिग बॉस ओटीटी'चा विजेता ठरला आहे. एल्विश हा लोकप्रिय युट्यूबर आहे. युट्यूबवर त्याचे तीन चॅनल आहेत. या तिन्ही चॅनलच्या माध्यमातून तो कोट्यवधी रुपये कमावतो. एल्विशचा दिल्लीत आलिशान बंगला आहे. एल्विशने 2016 मध्ये युट्यूबवर पदार्पण केलं होतं. 'बिग बॉस ओटीटी'नंतर एल्विश नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत आला आहे.
संबंधित बातम्या