मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलिवूडचे तीन फॅशन डिझायनर आता ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने मनिष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितु कुमार नोटिस पाठवून चौकशीसाठी बोलावलं आहे. पंजाबमधील एका कॉंग्रेस नेत्याची मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशी सुरु आहे. या नेत्याकडून तीनही फॅशन डिझायनर्सना लाखो रुपयांची रोकड दिल्या गेल्याचा संशय ईडीला आहे.
बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून नाव असलेल्या समनिष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितु कुमार या तीनही डिझायनर्सकडून आयकर नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या अभिनेते आणि अभिनेत्रींनंतर आता फॅशन डिझायनर्सही ईडीच्या रडारवर आहेत.
पंजाबमध्ये एका काँग्रेसच्या नेत्याच्या घरच्या लग्नाच्यावेळी या तीन फॅशन डिझायनर्सना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं आणि त्यांना पैसा हा कॅशमध्ये देण्यात आला होता. ते पैसे जे आहेत ते मनी लाँडरिंग प्रकरणातून मिळवले होते असा आरोप त्या नेत्यावर आहे. तेच पैसे या तिघांना देण्यात आले होते. त्यामुळे या तीनही फॅशन डिझायनर्सना आता ईडीने वेगवेगळ्या तारखांना बोलावलं आहे. आता हे पैसे कॅशमध्ये का घेतले आणि किती घेतले याची चौकशी ईडी करणार आहे.
या तिघांनी कॅश पेमेंट घेतले आणि त्यावर कर भरला नाही हाही एक प्रकारचा गुन्हा आहे. मनिष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितु कुमार ही बॉलवूडमधील मोठी नावं आहेत. त्यामुळे या तिघांना नोटिस पाठवल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
महत्वाची बातम्या :