Salute Movie : 'सॅल्यूट' (salute) सिनेमात दुलकर सलमान (Dulquer Salmaan) मुख्य भूमिकेत आहे. हा मल्याळम सिनेमा असून या सिनेमाने दिग्दर्शन रोशन एंड्र्यूजने केले आहे. या सिनेमात दुलकरने पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारली आहे. या सिनेमाची दुलकरचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण आता सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 


सिनेमाचे पोस्टर शेअर करत दुलकरने लिहिले आहे,"देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आम्ही या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. पण लवकरच हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येईल".





देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोनामुळे प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेल्या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जानेवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या अनेक सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. यात शाहिद कपूरचा 'जर्सी', एसएस राजामौली यांचा 'आरआरआर',  चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित 'पृथ्वीराज' सिनेमाचा समावेश आहे. बाहुबली स्टार प्रभासच्या 'राधे श्याम' सिनेमाचीदेखील सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.


संबंधित बातम्या


Pushpa on OTT : अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा 'या' दिवशी हिंदींत होणार प्रीमिअर


Bajrangi Bhaijaan : सलमान खान आता 'पवन पुत्र भाईजान' होणार...'बजरंगी भाईजान' चा सिक्वेल येणार


Sushant Singh Rajput case : रिया चक्रवर्तीनंतर आणखी दोन आरोपींची खाती गोठवली, न्यायालयाने एनसीबीला फटकारले


Bigg Boss 15 : आणखी दोन आठवड्यांनी लांबला 'ग्रँड फिनाले', 'या' दोन स्पर्धकांची होणार एंट्री!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha