Me Vasantrao : 'मी वसंतराव' (Me Vasantrao) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचे सध्या प्रेक्षकांसह समीक्षकांकडून कौतुक होत आहे. अशातच डॉ. रघुनाथ माशेलकरदेखील 'मी वसंतराव' सिनेमा पाहून भारावून गेले आहेत. 'मी वसंतराव' सिनेमा पाहून पुढील 20 वर्षे काम करण्याची ऊर्जा मिळाली. अशी प्रतिक्रिया पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिली आहे.





वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल मला फार आदर आहे. राहुल मध्ये वसंतराव आहेत हे आज मला या सिनेमामुळे जाणवलं. हा सिनेमा पाहताना प्रत्येक टप्प्यावर नवीन पैलू उलगडत जातातं. सिनेमाची निर्मिती, मांडणी इतकी सुंदर आहे की, सिनेमा पाहताना माझ्या डोळ्यात चक्क पाणी होतं. 'मी वसंतराव'ने मला पुढील वीस वर्षांसाठी काम करण्याची ऊर्जा दिली आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिली आहे.






जिओ स्टुडिओज प्रस्तुत या सिनेमात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ प्रमुख भूमिकेत आहेत. निपुण धर्माधिकारी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. . सोशल मीडियावरही या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सिनेमात वसंतराव देशपांडे यांची भूमिका त्यांच्या नातवाने म्हणजेच राहुल देशपांडेने साकारली आहे.


संबंधित बातम्या


Gulhar : 'लहर आली, लहर आली गं...'; गल्हरमधील गाणं प्रदर्शित


kgf chapter 2 : केजीएफ- 2 ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई


ते जन्मले तेव्हा आकाश उजळले होते; गझलसूर्य सुरेश भट यांची जयंती