Doctor Strange In The Multiverse of Madness : मार्वल स्टुडिओचा बहुचर्चित 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’चा (Doctor Strange In The Multiverse of Madness) दुसरा भाग आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 6 मे रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता.
2016 साली 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता हा सिनेमा प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. त्यामुळे आता हा सिनेमा जगभरातील सिनेप्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारने सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेप्रेक्षकांना माहिती दिली आहे.
सहा भाषेत प्रदर्शित
'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’चा दुसरा भाग प्रेक्षक सहा वेगवेगळ्या भाषेत पाहू शकतात. इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात बेनेडिक्ट कंबरबॅटने डॉक्टर स्ट्रेंजचं पात्र साकारलं आहे.
'डॉक्टर स्ट्रेंज 2’ने केली रेकॉर्डब्रेक कमाई
'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’च्या दुसऱ्या भागाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या सिनेमाने जगभरात 932 मिलियन डॉलरचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाने अमेरिकेतच 400 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.
संबंधित बातम्या