Doctor Strange in the Multiverse of Madness Ban : मार्व्हल स्टूडियोजच्या   ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ या चित्रपटाची मार्व्हलचे चाहते उत्सुकतेन वाट पाहात आहेत. पण आता  सौदी अरेबियामध्ये तसेच इतर काही देशांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. जगभरातील अनेक प्रेक्षक मार्व्हलच्या चित्रपटांचे चाहते आहेत. अनेक देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  सौदी अरेबियामध्ये हा चित्रपट बॅन करण्यामागचे कारण जाणून घेऊयात...


एका रिपोर्टनुसार, मार्व्हल स्टुडिओच्या डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस चित्रपटामध्ये  समलैंगिक पात्र असल्याने सौदी अरेबिया आणि इतर अनेक अरब देशांमध्ये  या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट अमेरिकेमध्ये सहा मे रोजी रिलीज होणार आहे. तसेच हा चित्रपट पाच मे रोजी सौदी अरेबियामध्ये रिलीज होणार होता पण आता ‘डॉक्टर स्ट्रेंज’ या सिक्वेलला  सौदी अरेबिया येथे बॅन करण्यात आलं आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौदी अरेबियाच्या सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला वितरण प्रमाणपत्र दिलेले नाही.  ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ चित्रपटाचं दिग्दर्शन सॅम राइमी यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री  शोचिटल गोमेजनं समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारली आहे.


‘डॉक्टर स्ट्रेंज 2’ म्हणजेच  ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा चित्रपट अमेरिकेसोबतच भारतामध्ये देखील सहा मे रोजी प्रदर्शित होणार आहे.  भारतामध्ये हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या