Doctor G Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'डॉक्टर जी' (Doctor G) हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आयुष्मानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3.65 कोटींचे नेट कलेक्शन केले होते. पहिल्या दिवशी चांगली कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ झाली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी अंदाजे 5.25 कोटी (Doctor G Collection) रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या नेट कलेक्शनमध्ये जवळपास 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हा सामाजिक विषयांवर चित्रपट बनवण्यासाठी ओळखला जातो. आता तो अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे, ज्याची कथा आणि पात्र हटके होते. प्रेक्षकांनीही त्याला या पात्रांमध्ये पसंती दिली आहे. 'डॉक्टर जी' द्वारे आयुष्मानने पुन्हा एकदा असेच एक हटके पात्र निवडले आहे, जे लोकांवर खोल छाप सोडत आहे. सामाजिक विषयांवर बनलेल्या ‘डॉक्टर जी’ या चित्रपटाचे एकूण बजेट 35 कोटी रुपये आहे. शनिवारच्या कलेक्शन चांगला आकडा पाहून, रविवारी सुट्टी असल्याने ‘डॉक्टर जी’ चांगला व्यवसाय करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. अनुराग कश्यपची बहीण अनुभूती कश्यप या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
काय आहे कथानक?
‘डॉक्टर जी’ या चित्रपटाची कथा एका अशा तरुणाची आहे, ज्याला ऑर्थोपेडिकमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घ्यायचे आहे. परंतु, काही कारणास्तव त्याला त्या विभागात शिकण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे त्याला स्त्रीरोग विभाग निवडावा लागतो. या अभ्यासानंतर तो तरुण स्त्रीरोगतज्ज्ञ बनतो. यादरम्यान त्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते आणि तो त्यांचा कसा सामना करतो, ही या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटातून अनुराग कश्यपची बहीण अनुभूती कश्यपने दिग्दर्शनात पदार्पण केले. हा चित्रपट तब्बल 2500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.
मागील चित्रपटांपेक्षा चांगली कमाई?
‘डॉक्टर जी’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन आयुष्मानच्या मागील रिलीज झालेल्या ‘अनेक’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा खूपच चांगले आहे. ‘अनेक’ने पहिल्या दिवशी 1.77 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर आयुष्मानच्या 'चंडीगढ करे आशिकी' या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. रिलीज झाल्यापासून, ‘डॉक्टर जी’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. आयुष्मान व्यतिरिक्त या चित्रपटात शेफाली शाह आणि रकुल प्रीत सिंह यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा :