MNS Deepotsav 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (MNS) दरवर्षी दीपोत्सवाचं (Deepotsav 2023) आयोजन केलं जातं. मनसेच्या 'दिपोत्सव 2023' या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईतील शिवाजी पार्कात (Shivaji Park) करण्यात आलं आहे. यंदाचा हा दीपोत्सव खूपच खास असणार आहे. मनसेच्या दीपोत्सवात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. 


मनसेच्या वतीने दरवर्षी दिवाळीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाची मनसैनिक आतुरतेने वाट पाहत असतात. मनसेच्या दीपोत्सवाचं यंदा अकरावे वर्ष आहे. सलीम-जावेद (Salim-Jawad) यांच्या शुभहस्ते 'दिपोत्सव 2023'चं उद्धाटन होणार आहे. हा कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्कवर पार पडणार आहे.






सलीम-जावेद जोडीबद्दल जाणून घ्या...


सलीम खान (Salim Khan) आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) या जोडीने आजवर अनेक कलाकृतींसाठी पटकथा लिहिल्या आहेत. बॉलिवूडमधील ही लोकप्रिय पटकथालेखन करणारी जोडी आहे. सलीम-जावेद यांनी 1970 मध्ये भारतीय सिनेसृष्टीत क्रांती घडवून आणली आहे. बॉलिवूडपट ब्लॉकबस्टर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सलीम-जावेद यांच्या लिखानाचा भारतीयांवर प्रभाव पडतो. 1970 मध्ये त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा विविध विषयांवर भाष्य केलं. डॉन, सीता-गीता, मजबूर, क्रान्ती, त्रिशूल, शोले, मिस्टर इंडिया, शक्ति, जंजीर, शान, काला पत्थर, हाथी मेरे साथी, यादों की बारात, दीवार अशा अनेक सिनेमाचं लेखन सलीम-जावेद या जोडीने केलं आहे. 


मनसेच्या दीपोत्सवात सेलिब्रिटी लावणार हजेरी


'दीपोत्सव 2023'चा दुसरा दिवसही खास असणार आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी दीपोत्सवाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani), लेखक अभिजात जोशी (Abhijat Joshi), निर्माते साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala), दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या हस्ते 10 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता उद्धाटन होणार आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्कवर मनसेच्या वतीने दीपोत्साचं आयोजन केलं आहे. दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच 'दीपोत्सव' हे गेल्या 11 वर्षांपासून जणू समीकरणच बनलं आहे. शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करण्यात येत असते. मनसेच्या दीपोत्सवात मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारदेखील हजेरी लावत असतात. हा दीपोत्सव तुळसी विवाहापर्यंत सुरू असतो. मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या दीपोत्सवाला हजेरी लावतात.


संबंधित बातम्या


Diwali 2022 : शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरे एकत्र येणार