Guess Who : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक सूपरस्टार अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयासह सौंदर्याला जलवा दाखवला आहे. 90 च्या दशकात अनेक टॉप अभिनेत्रींचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला होता. काही अभिनेत्री त्यांच्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर फारच कमी वयात प्रसिद्धीझोतात आल्या. काहींना पहिल्या चित्रपटापासून प्रसिद्धी मिळाली, त्याच्या मोठा चाहतावर्गही निर्माण झाला. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीचा मृत्यू


90 च्या दशकातील एका अभिनेत्री फार कमी वयात आणि फार कमी वेळा खूप प्रसिद्धी मिळवली. तिचा अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर तिने झटपट यशाचं शिखर गाठलं पण ती अभिनेत्री तितक्याच लवकर गायबही झाली. 90 च्या दशकातील ही टॉप अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. अभिनेत्री दिव्या भारतीने तेलगु चित्रपटांतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, यानंतर अवघ्या काही वर्षांमध्ये ती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली. तिला मोठ-मोठ्या चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. तिच्यासोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक-निर्मात्यांच्या रांगा लागल्या होत्या. पण, या अभिनेत्रीने अचानक या जगाचा निरोप घेतला.


अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर 12 चित्रपट अपूर्ण


अभिनेत्री दिव्या भारतीने 1990 साली आलेल्या 'बोबिली राजा' या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 1992 मध्ये आलेला 'विश्वात्मा' हा चित्रपटातून दिव्या भारतीचा पहिल्या बॉलिवूड चित्रपट होता. डेब्यू चित्रपटापासूनच दिव्या भारतीला प्रसिद्धी मिळाली. दिव्या भारतीचा वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ज्या मृत्यूचं गूढ आजपर्यंत उकललं गेलेलं नाही.


दिव्या भारतीच्या अपूर्ण चित्रपटांतून इतराचं नशीब उजळलं


दिव्या भारती फार लहान वयात यशाच्या शिखरावर पोहोचली. दिव्या फार लहान वयात बॉलिवूडची स्टार अभिनेत्री झाली. तिच्याजवळ चित्रपटांच्या अनेक ऑफर असायच्या. दिव्या भारतीने जेव्हा जगाचा निरोप घेतला तेव्हा तिचे 12 चित्रपट अपूर्ण राहिले होते. तिच्या निधनानंतर इतर अभिनेत्री या चित्रपटात काम करुन हिट ठरल्या. त्यापैकी 12 चित्रपटांपैकी 9 चित्रपटांमध्ये इतर अभिनेत्रींना काम केलं आणि तीन चित्रपट रद्द झाले. 


दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर तिचे अपूर्ण चित्रपट करणाऱ्या अभिनेत्री कोण होत्या आणि बॉक्स ऑफिसवर त्या अपूर्ण चित्रपटांचे काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं उत्तर जाणून घ्या.


त्या 12 चित्रपटांचं काय झालं?


दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर तिच्या अपूर्ण 12 चित्रपटांपैकी चिंतामणी, कन्यादान आणि दो कदम दिब्बा हे तीन चित्रपट कायमचेच रखडले. इतर 9 चित्रपटांपैकी मोहरा चित्रपटात रवीना टंडने काम केलं आणि मोहरा सुपर डुपर हिट ठरला होता. दिलवाले चित्रपटातही रवीनाने काम केलं, तो चित्रपटही हिट ठरला. 


काजोल-श्रीदेवी आणि तब्बूलाही संधी


दिव्या भारतीच्या अपूर्ण चित्रपटांमध्ये मोहरा आणि दिलवाले चित्रपटांव्यतिरिक्त हलचल, विजयपथ, आंदोलन आणि लाडला या चित्रपटांचाही समावेश होता. श्रीदेवीने लाडला, तब्बूने विजयपथ, काजोलने हलचल चित्रपटांमध्ये काम केलं आणि हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले, तर ममता कुलकर्णीलाही आंदोलन चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, या चित्रपटाने सरासरी कमाई केली.