Jai Bhim Movie: प्रकाश राज आणि सूर्या यांचा 'जय भीम' सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. आदिवासी लोकांवर होणाऱ्या अन्यायावर हा चित्रपट भाष्य करतो. हा तमिळ सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटातील एका दृश्यावर सोशल मीडियावर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. 


चित्रपटातील एका दृश्यात अभिनेता प्रकाश राज एका व्यक्तीच्या कानाखाली मारतात. त्यावेळी समोरचा व्यक्ती हिंदी भाषेत "मला का मारले" असे विचारतो. त्यावर प्रकाश राज म्हणतात,"तु हिंदीत का बोललास तमिळ भाषेत बोल". असे म्हणत ते त्या व्यक्तीला चांगलाच दम देतात. चित्रपटातील हा सीन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.







प्रकाश राज हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड
प्रकाश राज यांना सोशल मीडियावर नेहमीच ट्रोल करण्यात येत असते. प्रकाश राज त्यांचे विचार त्यांच्या चित्रपटांतून दाखवतात, असे आरोप करत प्रकाश राज यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर प्रकाश राज यांच्या नावाचा हॅशटॅगदेखील सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. 


Rajinikanth Film: रजनीकांतचा 'अन्नात्थे' भारतासह सातासमुद्रापार प्रदर्शित होणार


काय आहे चित्रपटाचे कथानक?
पोलीस एकाठिकाणी काही आदिवासी समाजातील पुरुषांना जबरदस्तीने घेऊन जातात. तिथे त्यांचा अतोनात छळ करण्यात येतो. पोलीस त्यांना न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यास सांगतात. त्या आदिवासींपैकी एक म्हणजे राजकानू. ज्याची पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी चंद्रू नावाच्या वकिलाची मदत घेते. चंद्रू मानवाधिकार प्रकरणांवर विशेष लक्ष देतो. पण या प्रकरणाचा तळ गाठताना कोणते घृणास्पद सत्य समोर येते, ही या चित्रपटाची कथा आहे.


Sooryavanshi Song Out : 'सूर्यवंशी'चं नवं गाणं प्रदर्शित; अक्षय कतरिनाचा रोमॅंटिक अंदाज