Annaatthe Mania: सुपरस्टार रजनीकांतचा 'अन्नात्थे' सिनेमा भारतासह विदेशातदेखील प्रदर्शित होणार आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर हा सिनेमा 1 हजार 100 पेक्षा अधिक सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सन पिक्चर्सने दिलेल्या माहितीनुसार, विदेशात प्रदर्शित झालेल्या तमिळ सिनेमांपैकी हा सगळ्यात मोठा बिग बजेट सिनेमा आहे. 'अन्नात्थे'च्या निर्मात्यांनी ट्विट केले आहे, 'अन्नात्थे' सिनेमा अमेरिकेतील 677 सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


'अन्नात्थे' सिनेमा अरबमधील 117 सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तर मलेशियातील 110 सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यासोबत श्रीलंकेतील 86 सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. 


Sooryavanshi Song Out : 'सूर्यवंशी'चं नवं गाणं प्रदर्शित; अक्षय कतरिनाचा रोमॅंटिक अंदाज


कॅनडामधील 17 तर यूनायटेड किंगडममधील 35 सिनेमागृहात 'अन्नात्थे' प्रदर्शित केला जाणार आहे. त्यासोबत यूरोपमधील 43 सिनेमागृहात तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमधील 85 सिनेमागृहात 'अन्नात्थे' प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी आता फक्त एकच दिवस बाकी असल्याने चाहत्यांमध्येदेखील सिनेमाची उत्सुकता दिसून येत आहे.


Madhuri Dixit : धक धक गर्लचं घरभाडं धड धड वाढवणारं, माधुरी दीक्षितच्या घराचं भाडं IAS अधिकाऱ्याच्या पगारापेक्षा जास्त


 'अन्नात्थे' सिनेमात रजनीकांत व्यतीरिक्त नयनतारा, खुशबू, मीना, किर्ती सुरेश आणि जगपती बाबूदेखील दिसून येणार आहेत. या सिनेमाला इम्मान यांनी संगीत दिले आहे. तर वेट्री यांनी या सिनेमाचे छायांकन केले आहे.


Rajinikanth Discharged: सुपरस्टार रजनीकांत यांना मिळाला डिस्चार्ज, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण


रजनीकांत यांना केले दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित


मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर रजनीकांत यांनी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. त्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते रजनीकांत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.


SRK VS Jayant Patil : असशील तू कोणीही मोठा स्टार..जेव्हा जयंत पाटलांनी शाहरुखला चारचौघात झापलं