Kazan Khan Passed Away : लोकप्रिय अभिनेते कझान खान (Kazan Khan) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कझान खान यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. प्रोडक्शन कंट्रोलर आणि सिने-निर्माते एनएम बदूशा यांनी कझान खान यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली आहे. 


कझान खान यांचा सिनेप्रवास... (Kazan Khan Popular Movies)


कझान खान खलनायक म्हणून खूपच लोकप्रिय होते. त्यांनी अनेक मल्याळम सिनेमांत काम केलं आहे.'गंधर्वम' (Gandharvam), 'सीआयडी मूसा' (Cid Moosa), 'द किंग' (The King), 'वर्णपाकिट' (Varnapakittu), ड्रीम्स (Dreams) , द डॉन (The Dawn), 'मायामोहिनी' (Mayamohini) , 'राजाधिराज' (Rajadhiraja), 'इवान मर्यादरमन' (Ivan Maryadaraman), 'लैला ओ लैला' (Laila O Laila) या सिनेमांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 







कझान खान यांनी 'सेंथमीज पाट्टू' (Senthamizh) या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून 1992 साली रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. मल्याळम (Malayalam) सिनेमांसह तामिळ (Tamil) आणि कन्नड (Kannada) सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. 50 पेक्षा अधिक सिनेमांत त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. 'आर्ट ऑफ फाइटिंग 2' (Art Of Fighting 2) या इंग्रजी सिनेमातदेखील त्यांनी काम केलं आहे.


'या' सिनेमात शेवटचे झळकले कझान खान


1992 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारे कझान खान 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'लैला ओ लैला' (Laila O Laila) या सिनेमात शेवटचे दिसले. 2015 नंतर ते कोणत्या सिनेमात दिसून आले नाही. गेल्या आठ वर्षांपासून ते इंडस्ट्रीतून गायब होते. कझान खान यांच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता होती. बॉलिवूड सिनेमांच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. कझान खान यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीने एख कसदार अभिनेता गमावला आहे. 


संबंधित बातम्या


Park Soo Ryun Passes Away: पायऱ्यांवरून पडून 29 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू; कुटुंबियांचा अवयवदानाचा निर्णय