Director With Highest 100 Crore Films: बॉलिवूडमध्ये (Bollywood) जेव्हा-जेव्हा टॉप दिग्दर्शकांबाबत (Directors) बोललं जातं, त्या-त्या वेळी राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani), संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali), करण जोहर (Karan Johar) आणि आशुतोष गोवारिकर (Ashutosh Gowariker) यांसारख्या दिग्दर्शकांचं नाव घेतलं जातं. एआर मुर्गदॉसचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणारी पहिली हिंदी फिल्म आहे. पण, तुम्हाला माहितीय का? सर्वाधिक वेळा 100 कोटींच्या फिल्म्स देण्याचा रेकॉर्ड कोणत्या दिग्दर्शकाच्या नावावर आहे? 


हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक असा दिग्दर्शक आहे, ज्यानं आपल्या दमदार ॲक्शन आणि स्टारकास्टनं सर्वाधिक 100 कोटींचा चित्रपट बनवण्याचा विक्रम केला आहे. नुकताच त्याचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे, सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवतोय. एवढ्या हिट्स चित्रपटांची ज्या-ज्या वेळी चर्चा होते. त्या-त्या वेळी बॉलिवूडच्या काही दिग्गज दिग्दर्शकांची नावं आपल्या समोर येतात. त्यात संजय लीला भन्साली, राजकुमार हिरानी, करण जोहर यांसारख्या नावांचा समावेश होते. पण, आम्ही ज्या दिग्दर्शकाबाबत सांगत आहोत, त्याचं नाव रोहित शेट्टी आहे. 


सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट देण्याचा विक्रम, रोहित शेट्टीच्या नावावर 


रोहित शेट्टीनं त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत असे एकूण 10 चित्रपट दिले आहेत, जे 100 कोटी क्लबचा भाग बनले आहेत. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'सिंघम अगेन' या चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे. यासह रोहितनं सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट देण्याचा मान पटकावला आहे. रोहित शेट्टीच्या शेवटच्या 11 पैकी दहा चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.


'या' चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर कल्ला 


2010 मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'गोलमाल 3' हा 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणारा रोहित शेट्टीचा पहिला चित्रपट. यानंतर  'सिंघम' (2011), 'बोल बच्चन' (2012), 'चेन्नई एक्सप्रेस' (2013), 'सिंघम रिटर्न्स' (2014), 'दिलवाले' (2015), 'गोलमाल अगेन' (2017), 'सिम्बा' (2018) आणि 'सूर्यवंशी' (2021) हे सर्व चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. अशातच अजय देवगण स्टारर 1 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज झालेला 'सिंघम अगेन'सुद्धा मोठ्या दिमाखात 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. ज्यानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. 


16 चित्रपटांनी कमावले 3000 कोटी 


2022 साली रिलीज झालेला रोहित शेट्टीचा 'सर्कस' हा एकमेव चित्रपट होता, जो बॉक्स ऑफिसवर जोरात आपटला. रोहित शेट्टीच्या 16 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 3000 कोटींहून अधिक कमाई केली. आजपर्यंत एकाही दिग्दर्शकानं हा आकडा पार केलेला नाही. रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स आणि 'गोलमाल' सिरीज या दोन फिल्म फ्रँचायझी बनवल्या आहेत. कॉप युनिव्हर्सच्या पाच चित्रपटांनी 1250 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. त्याचबरोबर गोलमालचे पाच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर एकूण 669 कोटींची कमाई केली आहे.