Hansal Mehta : बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माते-दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Virus) असल्याचे आढळून आले असून, त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली आहे. हंसल मेहता यांनी त्यांच्या इन्स्टा पोस्टमध्ये सांगितले की, त्यांना कोरोना संसर्ग झाला आहे आणि यावेळी त्यांची लक्षणे फारशी सौम्य नाहीत. त्यांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. लक्षणे फारशी सौम्य नाहीत. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना मी आवश्यक पावले उचलण्याची विनंती करेन. कृपया सुरक्षित रहा.'




हंसल मेहता कोरोना पॉझिटिव्ह होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2021 मध्ये देखील त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, ज्याची माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना दिली होती.


बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण


यंदा कोरोनाची लागण झालेल्या बॉलिवूड कलाकारांच्या यादीत आता हंसल मेहता यांचे नाव देखील सामील झाले आहे. काही आठवड्यांपूर्वी, अनेक सेलिब्रिटींनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती शेअर केली होती. ज्यामध्ये कतरिना कैफ, कार्तिक आर्यन आणि शाहरुख खान यांच्या नावाचाही समावेश होता. आता हंसल मेहता यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय टीव्ही अभिनेत्री निक्की तांबोळी हिनेही म्हटले की, तिला देखील कोरोनाची लागण झाली आहे आणि तिला श्वास घेण्यास खूप त्रास होत आहे.


आघाडीचे दिग्दर्शक-निर्माते


हंसल मेहता यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. ‘स्कॅम 1992’ ही त्यांची वेब सीरिज ब्लॉकबस्टर ठरली होती. आगामी चित्रपटांच्या यादीत, हंसल मेहता लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'कॅप्टन इंडिया' हा चित्रपट घेऊन येणार आहेत, जो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


पुन्हा एकदा देशभरात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. अनेक जण पुन्हा कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. देशात कोरोना व्हायरससोबत आता मंकीपॉक्सचाही शिरकाव झाला आहे. या विषाणूला रोखण्यासाठी सरकार आधीच खबरदारी घेत, महत्त्वाची पावले उचलत आहे. देशासाठी ही नवीन चिंतेची बाब आहे.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 26 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Sonu Sood : कोरोनाकाळात केलेल्या विशेष कार्याबद्दल सोनू सूदचा 'आयएए विशेष पुरस्कारा'ने सन्मान