K.C. Sharma Passed Away : 'गदर'सारखे (Gadar) अनेक मोठे आणि हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांचे वडील आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते के. सी. शर्मा (K. C. Sharma) यांचे शुक्रवारी रात्री त्यांच्या अंधेरी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 89 वर्षांचे होते. मागील काही काळापासून ते आजारी होते. के.सी. शर्मा यांनी मनोरंजन विश्वात अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांनी 'तहलका', 'जवाब' आणि 'पोलिसवाला गुंडा' या चित्रपटांची निर्मिती केली होती. मीडिया रिपोर्टनुसार के.सी. शर्मा यांना जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. 19 ऑगस्ट रोजी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचवेळी त्यांचे निधन झाले.
दिवंगत निर्माते के.सी.शर्मा यांच्या निधनाबाबत अधिक माहिती देत त्यांची सून सुमन शर्मा यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, 'के.सी.शर्मा दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांना स्मृतिभ्रंशही झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून जागेवरच होते. ते एखाद्या जागेवरून उठून चालू देखील शकत नव्हते. काल रात्री 8.00च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्या अंधेरी येथील घरी त्यांचे निधन झाले.’
आज होणार अंत्यसंस्कार
सुमन शर्मा यांनी सांगितले की, यावेळी त्यांचे सासरे के. सी. शर्मा यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असून, आज (20 ऑगस्ट) दुपारी मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘या’ चित्रपटांची केली निर्मिती
निर्माते के.सी. शर्मा हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव होते. के.सी. शर्मा यांनी ‘श्रद्धांजली’, ‘हुकूमत’, ‘तहलका’, ‘जवाब’, ‘ऐलन-ए-जंग’, ‘पोलिसवाला गुंडा’, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों’ यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली होती. के. सी. शर्मा यांनी निर्मिती केलेले बहुतेक चित्रपट दिग्दर्शित करण्याचे श्रेय त्यांचा दिग्दर्शक मुलगा अनिल शर्मा यांना जाते. के.सी. शर्मा यांनी निर्मित केलेले बहुतांश चित्रपट हे त्यांचा मुलगा अनिल शर्मा यांनीच दिग्दर्शित केले होते. यात त्यांनी ‘अपने’, ‘वीर’, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों’, ‘महाराजा’, ‘माँ’, ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
हेही वाचा :