Diljit Dosanjh Concert Video : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचे देशविदेशात लाखो चाहते आहेत. अलिकडे त्याचा दिल्लीमध्ये कॉन्सर्ट पार पडला. दिलजीत दोसांझच्या भारतातील कॉन्सर्टची घोषणा झाली, तेव्हा अवघ्या काही मिनिटांमध्ये तिकीटे विकली गेली होती. हजारोंच्या किमतील तिकीटांची विक्री झाली. तिकींटांच्या जास्त किमतीवरुन टीकाही झाली होती. यानंतर  26 आणि 27 ऑक्टोबरला दिल्लीत दिलजीतचा कॉन्सर्ट मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला. मात्र, कॉन्सर्टनंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


दिलजीत दोसांझच्या अडचणी वाढल्या? 


दिलजीतच्या कॉन्सर्टमुळे खेळाडूंचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. दिलजीतचं कॉन्सर्ट दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पार पडलं. या कॉन्सर्टनंतर या ठिकाणचं चित्र पाहण्यासारखं होतं. सर्वत्र दारुच्या बॉटल्स आणि कचऱ्याचा ढीग पडला होता. यामुळे खेळाडूंचं मात्र नुकसान झालं आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळाडू सराव करतात मात्र, कॉन्सर्टच्या दुसऱ्या दिवशी तिथे छिन्नविछिन्न अवस्था पाहायला मिळाली. 


कॉन्सर्टमुळे खेळाडूंचं नुकसान


दिलजीत दोझांजच्या कॉन्सर्टचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता कॉन्सर्टनंतर स्टेडिअमवरील परिस्थितीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दिलजीतच्या कॉन्सर्टमुळे खेळाडूंचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे दिलजीत आणि आयोजकांवर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. स्टेडिअमची दुरावस्था पाहून खेळाडूंचंही खच्चीकरण झालं आहे.


कॉन्सर्टमुळे दिलजीतच्या अडचणी वाढल्या


दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दिलजीत दोसांझचं कॉन्सर्ट झालं. या स्टेडियमवर भारतीय खेळाडू सराव करतात. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू या ठिकाणी दररोज सराव करत असतात. आता ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप लवकरच होणार आहे, त्यासाठी खेळाडू तयारीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण, आता या कॉन्सर्टमुळे त्यांचा मार्गात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत.  जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रात्रंदिवस सराव करणाऱ्या खेळाडूंना दिलजीतच्या कॉन्सर्टनंतर सोमवारी मैदानाची स्वच्छता करावी लागली.


सरावाच्या ठिकाणी दारुच्या बॉटल्स अन् कचऱ्याचा ढीग






कॉन्सर्टमुळे खेळाडूंच्या सामानाचं नुकसान


दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टपूर्वी, खेळाडूंनी त्यांचे ॲथलेटिक्सचं सामान वॉर्म अप क्षेत्रात ठेवलं होतं. खेळाडूंनी स्वत:च्या पैशातून या वस्तू खरेदी केल्या होत्या. हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, आयोजकांनी ॲथलेटिक्सचं सामान अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळलं. ॲथलेटिक्सचं साहित्या चुकीच्या प्रकारे  ठेवल्यामुळे त्यांची मोडतोड होऊन खेळाडूंचं मोठं नुकसान झालं आहे. यातील बरंच सामान तुटलं.  


कार्यक्रम आयोजित करण्याचा हा कोणता मार्ग?


"खेळाडूंचं सामान अत्यंत निष्काळजीपणे ठेवण्यात आलं होतं. हे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचं (SAI-Sports Authority of India) सामान नव्हतं, ते खेळाडूंचं वैयक्तिक सामान होतं. आम्ही SAI कडे यासंदर्भात तक्रार केली आहे. आयोजकांना या नुकसानीची भरपाई करावी लागणार आहे", हिंदुस्तान टाईम्सची बोलताना कोचने हे माहिती दिल आहे. कार्यक्रम आयोजित करण्याचा हा कोणता मार्ग? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


VIDEO : दिवाळी पार्टीत कडेकोट बंदोबस्तात पोहोचला बिग बॉसचा विजेता मुनव्वर फारुकी, बिश्नोईच्या धमकीनंतर सुरक्षेत वाढ