Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपलं नशीब आजमावण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. असंच स्वप्न उरी बाळगून एक तरुणी धडपडत होती. पण, तिचं सौंदर्य तिच्या स्वप्नांच्या आड येत होतं. ही तरुणी म्हणजे, जणू स्वर्गातून अवतरलेली अप्सरा. लहानपणापासूनच नजर हटू न देणारं सौंदर्य तिच्या नशीबी आलं. अखेर अनेक नकारांनंतर या अभिनेत्रीनं डेब्यु केला खरा, पण त्यानंतर तिला अपेक्षेप्रमाणे काम मिळू शकलं नाही. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून सौंदर्याची खाण असलेली मिस एशिया पॅसिफिकचा खिताब पटकावलेली दिया मिर्झा (Dia Mirza).
दिया मिर्झा... लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत. आजही दिया मिर्झा आपल्या निखळ सौंदर्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेते. लहानपणापासूनच गोंडस आणि सुंदर दिया सर्वांना आपली भूरळ घालायची. दियाची आई बंगाली हिंदू आणि वडील जर्मन होते. तिच्या सौंदर्यामुळेच ती अभिनेत्री बनली, पण तिला इंडस्ट्रीत हवं तेवढं आणि हवं तितकं काम मिळालं नाही. खरं तर, खूप सुंदर असल्यामुळे ती बहुतेक पात्रांमध्ये बसत नव्हती, असं अनेक दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. दियाला खूप नकारांचा सामना करावा लागला.
जर तुम्ही सुंदर असाल आणि थोडासा अभिनय माहीत असेल तर तुम्ही चित्रपटसृष्टीत अभिनेत्री बनून प्रसिद्ध होऊ शकता, असा एक सामान्य समज. पण बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा अनुभव काहीसा उलट होता. तिचं देखणं रुप अनेकांना घायाळ करायचं, अभिनयातही तरबेज, पण तिच्या एवढ्या टॅलेंटेड अभिनेत्रीला जे मिळायला हवं होतं, ते काही मिळालं नाही. दरम्यान, तिचं सौंदर्यचं तिचा शत्रू ठरलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तिला खूप नकारांचा सामना करावा लागला होता. अनेकदा दिग्दर्शक तिच्या लूकला 'मेन स्ट्रीम' म्हणून नाकारायचे.
आम्ही प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा... एक काळ असा होता, जेव्हा दियाचं निखळ सौंदर्यानंच तिच्या विरोधात काम करायला सुरुवात केली होती. दियाची आई बंगाली आणि वडील जर्मन, परंतु तिच्या आईनं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दिया तिच्या वडिलांचं नाव लावत नाही.
दिया मिर्झा लहान असताना तिच्या आईनं तिचे जर्मन वडील हेड्रिस जर्मन यांच्यापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर आईनं हैदराबादच्या अहमद मिर्झा यांच्याशी विवाह केला. अहमद मिर्झा यांनी दियावर आपल्या सख्ख्या मुलीसारखं प्रेम केलं. दियानं आपल्या नावापुढे सावत्र वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली.
...अन् बॉलिवूड डेब्यु कन्फर्म झाला
दिया मिर्झानं 2001 मध्ये आर. माधवनसोबत आपला बॉलिवूड डेब्यु केला. 'रहना है तेरे दिल में'मध्ये दिसलेली आर. माधवन आणि दिया मिर्झाची जोडी चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री सर्वांना खूपच भावली.
दिया मिर्झाला अर्थपूर्ण चित्रपट करायचे होते, पण अशा चित्रपटांच्या दिग्दर्शकांना ती त्या भूमिकेसाठी योग्य वाटायची नाही. ती अतिशय सुंदर असल्यामुळे ती त्या पात्रांसाठी योग्य नव्हती, असं दिग्दर्शक तिला सांगायचे आणि नकार द्यायचे, असं स्वतः दियानं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं.
दिया मिर्झानं 2000 मध्ये मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनलचा खिताब जिंकला होता. तिनं आपल्या करिअरमध्ये 'दस', 'लगे रहो मुन्ना भाई', 'हनीमून ट्रॅवल्स प्रायवेट लिमिटेड' आणि 'संजू' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :