Aishwarya Rai And Abhishek Bachchan: काही दिवसांपर्यंत बॉलिवूडचं (Bollywood) परफेक्ट कपल म्हणून ओळखलं जाणाऱ्या ऐश्वर्या (Actress Aishwarya Rai) आणि अभिषेकच्या (Actor Abhishek Bachchan) घटस्फोटाच्या (Divorce) बातम्यांमुळे चर्चांना उधाण आलं आहे. फॅन्सच्या नजरा दोघांवर खिळल्या आहेत. आता घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली ऐश्वर्या एका दुर्धर आजारानं ग्रस्त असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. 


ऐश्वर्या राय-बच्चन म्हणजे, बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक. ती नेहमीच तिच्या लूक आणि स्टाइलनं चाहत्यांना वेड लावते. मात्र, काही काळापासून घटस्फोटाच्या चर्चा आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे ऐश्वर्या प्रचंड ट्रोल होत आहे. विशेषतः कान्स फेस्टिव्हलमधील ऐश्वर्याचा लूक विशेष चर्चेचा विषय झाला होता. यादरम्यान, ऐश्वर्या रायबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ऐश्वर्या रायबाबत एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दावा करण्यात आला आहे की, तिला एका गंभीर आजारानं ग्रासलं आहे. त्यामुळेच तिचं वजन वाढत आहे. त्यामुळे ती अंगभर कपडे घालते, ज्यामुळे तिचं संपूर्ण शरीर झाकलं जाईल. 


ऐश्वर्या कोणत्या आजारानं ग्रस्त? 


दैनिक पत्रिकानं दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर ऐश्वर्या राय गंभीर आजारानं ग्रस्त असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. ऐश्वर्या अनेक वर्षांपासून आरोग्याच्या व्याधींनी ग्रस्त असल्याचंही या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं आहे. ऐश्वर्या रायला ज्या आजारानं ग्रासलं आहे, तो आजार असा आहे की, यामध्ये ऐश्वर्याला स्वतःला खूप जपावं लागतंय. ना तिला इतर अभिनेत्रींसारखं डाएट फॉलो करता येत, ना वजन कमी करण्यासाठी ती कोणत्याही प्रकारची औषधं घेऊ शकत नाही. 


Reddit वर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, "माझ्या मित्रानं बॉलिवूडमध्ये काम केलं आहे आणि त्यानं सांगितलं की, ऐश्वर्या एका आजाराशी झुंज देतेय, ज्याबद्दल ती सांगू शकत नाही. या आजारामुळे ऐश्वर्याला काटेकोर डाएट पाळता येत नाही, त्यामुळे तिचं वजन वाढत आहे. पण वाढलेलं वजन कमी करण्यासाठी ती कोणतंही औषध सुद्धा घेऊ शकत नाही. तिच्या वाढलेल्या वजनामुळे अनेकजण तिला ट्रोल करतात, तिच्या स्टायलिस्टला ट्रोल करतात. पण, तुम्ही असं करू नका, यासाठी स्टायलिस्ट जबाबदार नाही. ऐश्वर्याला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केलं जात आहे. दरम्यान, अद्याप ऐश्वर्या राय किंवा तिच्या टीमकडून तिच्या वैद्यकीय स्थितीबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.


दरम्यान, बॉलिवूडचं सर्वाधिक चर्चेत असणारं कपल म्हणजे, अभिषेक-ऐश्वर्या. पण हे कपल सध्या एकत्र दिसत नाही. दोघेही वेगवेगळे स्पॉट होतात. अभिषेक संपूर्ण कुटुंबासोबत, तर ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत दिसते. त्यामुळे चाहत्यांमध्ये दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच, अजून दोघांकडूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे ऐश्वर्या-अभिषेकमध्ये सध्या चाललंय काय? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Aishwarya Rai, Abhishek Bachchan: अभिषेकसोबत वाद झाल्यानंतर सर्वात आधी ऐश्वर्या करते 'हे' काम; दोघांमध्ये सध्या चाललंय काय?