Dharmendra Prakash Kaur : बॉलिवूडचा 'रोमान्स किंग' अर्थात धर्मेंद्र (Dharmendra) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आज वयाच्या 88 व्या वर्षी धर्मेंद्र अनेक चित्रपटांमध्ये रोमान्स करताना दिसून आला आहे. मागील वर्षात त्याचा 'रॉकी रानी की प्रेम कहानी' (Rocky Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात ते शबाना आझमीसोबत लिप लॉक करताना दिसून आले. त्यांचा हा सीन चांगलाच चर्चेत आला होता. वैयक्तिक आयुष्यातही धर्मेंद्र आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असतात. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी अर्थात हेमा मालिनी (Hema Malini) आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. पण त्यांची दुसरी पत्नी प्रकाश कौर (Prakash Kaur) यादेखील सौंदर्याच्या बाबतीत काही कमी नाहीत. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 60 च्या दशकातील या फोटोने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. 


पहिल्या पत्नीसोबतचा धर्मेंद्र यांचा फोटो (Dharmendra Prakash Kaur Photo)


फेसबुकवरील Fabrica Trendz या पेजवर धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी प्रकाश कौर यांचा एक जुना फोटो आणि आत्ताचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहिला फोटो 1968 मधला आहे. या फोटोत ते आपल्या पहिल्या पत्नीसोबत दिसून येत आहेत. या फोटोमध्ये प्रकाश खूपच सुंदर दिसत आहे. तिने चॉकलेटी आणि सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. तसेच केसांचीदेखील खास हेअरस्टाईल बनवली आहे. दुसरा फोटो 2024 मधला आहे. या फोटोमध्ये प्रकाश कौर वयस्कर दिसून येत आहे. प्रकाश कौरसोबत धर्मेंद्रदेखील दिसून येत आहे. त्यांनी काळ्या रंगाची टोपी घातली आहे. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. 28 हजारापेक्षा जास्त लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. सौंदर्याच्या बाबतीत प्रकाश कौर बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देत असे. 



धर्मेंद्र आणि प्रकाश कौर 1954 मध्ये लग्नबंधनात अडकले. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना चार मुलं आहे. सनी देओल, बॉबी देओल हे सर्वांनाच माहिती आहेत. पण अजीता आणि विजेता मात्र लाइमलाइटपासून दूर आहेत. एक मुलगी सायकोलॉजिस्ट असून दुसरी दिग्दर्शक आहे. सनी आणि बॉबी देओल आपल्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्यापासून घटस्फोट घेतलेला नाही हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. पण तरीही त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं आहे. त्यांना दोन मुली आहेत. 


संबंधित बातम्या


Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा