Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंड सुरु आहे. जर एखाद्या चित्रपटामध्ये काही आक्षेपार्ह वाटलं तर त्या चित्रपटाला सोशल मीडियावर बॉयकॉट केलं जातं. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाला बॉयकॉट करण्यात आलं होतं. तसेच अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) लाल सिंह चढ्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाला देखील नेटकऱ्यांनी बॉयकॉट केलं. सोशल मीडियावर सुरु असलेल्या या बॉयकॉट ट्रेंडवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.


एएनआयच्या पॉडकास्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांना बॉयकॉट ट्रेंडबाबत विचारण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,  'काही चित्रपटांना बॉयकॉट केलं जात आहे, याबाबत माझ्या मनात एक विचार येतो की, एका चित्रपटाबद्दल असं वातावरण अचानक कसं निर्माण केलं जातं? काही वेळा हे अंतर्गत स्पर्धेतून होतं तर काही वेळा हे organic पद्धतीनं होतं, हे मी मान्य करतो. कधी कधी लोकांच्या मनात एका गोष्टी विषयी भावना निर्माण होते आणि ती भावना एका आंदोलनाचे रुप घेते. आपली जी सोशल मीडिया कम्युनिटी आहे ती, organically असं वातावरण निर्माण करते की, ज्यानंतर चित्रपटाला बॉयकॉट केलं जातं.'


'पण माझं मत असं आहे की, प्रत्येकवेळी हे organically होत नाही. अनेक वेळा हे अंतर्गत स्पर्धांमधून देखील होतं.' असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


पुढे देवेंद्र फडवणीसांनी सांगितलं, 'सेन्सॉर बोर्डाने ज्या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र दिले आहे त्या चित्रपटांना प्रदर्शित होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि आम्ही त्याला थांबवू देणार नाही!' 






लाल सिंह चढ्ढा, आदिपुरुष  या चित्रपटांबरोबरच ब्रह्मास्त्र या चित्रपटाला देखील बॉयकॉट करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली होती. बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड झाला होता. तर आदिपुरुष या चित्रपटामधील डायलॉग आणि कलाकारांच्या लूक्सवर अनेकांनी टीका करत या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Adipurush Controversy:  सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर 'आदिपुरुष'मधील हनुमानाचा 'तो' डायलॉग बदलला; असा आहे नवा डायलॉग