Adipurush Controversy:  अभिनेता प्रभासचा  (Prabhas)  'आदिपुरुष' (Adipurush)   हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर  सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे.या चित्रपटातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी आक्षेप घेतला. आता आदिपुरुष चित्रपटाच्या मेकर्सनं चित्रपटातील काही डायलॉग्स बदलण्याचा निर्मण घेतला आहे. चित्रपटातील कोणकोणते डायलॉग्स बदलण्यात आले आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


'कपड़ा तेरे बाप का...तो जलेगी भी तेरे बाप की' या आदिपुरुष चित्रपटामधील हनुमानाच्या डायलॉगवर अनेक नेटकऱ्यांनी टीका केली. आता हा डायलॉग बदलण्यात आला आहे. तसेच चित्रपटामधील इतर काही डायलॉग देखील बदलण्यात आले आहे. 


चित्रपटातील बदललेले डायलॉग्स:


'तू अंदर कैसे घुसा, तू जानता भी है कौन हूं मैं' हा डायलॉग बदलून  'तुम अंदर कैसे घुसे, तुम जानते भी हो कौन हूं मैं' असा करण्यात आला आहे. 


'कपड़ा तेरे बाप का...तो जलेगी भी तेरे बाप की'  हा आदिपुरुष चित्रपटातील हनुमानाचा डायलॉग बदलून 'कपडा तेरी लंका का ...तो जलेगी भी तेरी लंका'  असा करण्यात आला आहे.






 'जो हमारी बहनों...उनकी लंका लगा देंगे' हा डायलॉग बदलून  'जो हमारी बहनों...उनकी लंका में आग लगा देंगे'. असा करण्यात आला आहे. 


'मेरे एक सपोले ने तुम्हारे शेषनाग को लंबा कर दिया' हा आदिपुरुष चित्रपटातील डायलॉग बदलून 'मेरे एक सपोले ने तुम्हारे शेषनाग को समाप्त कर दिया'  असा करण्यात आला आहे. 


आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केलं.   चित्रपटातील हनुमानाच्या आधीच्या डायलॉगबाबत मनोज यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते  की, 'आजकालचे लोक या डायलॉगसोबत जोडले जावेत म्हणून जाणूनबुजून तो डायलॉग तसा लिहिला आहे. ही गोष्ट सामान्य भाषेत सांगितली आहे.फक्त हनुमानजीबद्दलच का बोलले जात आहे? भगवान श्रीरामांच्या संवादांवरही बोलले पाहिजे. माता सीतेच्या डायलॉगबद्दल देखील बोललं गेलं पाहिजे.


अभिनेता प्रभासनं आदिपुरुष या चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली 'आहे तर अभिनेत्री कृती सेनननं या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे.  अभिनेता देवदत्त नागेनं या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Adipurush: 'जाणूनबुजून तो डायलॉग...'; 'आदिपुरुष'मधील हनुमानाच्या डायलॉगला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर लेखकानं दिली प्रतिक्रिया