Adipurush: अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) यांचा 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट उद्या (16 जून) रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक जण या चित्रपटाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर करुन आदिपुरुष या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, देवेंद्र फडणवीस हे आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर बघत आहेत. 'मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर प्रभू श्री राम यांची कृपा व्हावी ही प्रार्थना.
दिग्दर्शक, निर्माते आणि आदिपुरुष चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा!'
काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या चित्रपटातील जय श्री राम हे गाणं रिलीज झालं. जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच या चित्रपटातील राम सिया राम हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. जय श्री राम आणि राम सिया राम या आदिपुरुष चित्रपटामधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष' हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
एका रिपोर्टनुसार, रिलीजआधीच आदिपुरुष चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. थिएट्रिकल राइट्स, सॅटेलाइट राइट्स, म्यूझिक राइट्स, डिजिटल राइट्स अशा अनेक गोष्टींमधून या चित्रपटाने रिलीजआधीच चांगलीच कमाई केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: