Adipurush: दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या  (Prabhas)   'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचा टीझर रविवारी (2 ऑक्टोबर) रिलीज झाला. या टीझरनं अनेकांचं लक्ष वेधलं. सध्या  'आदिपुरुष'  या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात काही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी देखील काम केलं आहे. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन (Kriti Sanon) ही सिता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. चित्रपटाच्या टीझरमधील एका मराठमोळ्या अभिनेत्यानं आता अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'आदिपुरुष' या चित्रपटातील रामभक्त हनुमानाची भूमिका देवदत्त नागे (Devdatta Nage) हा मराठमोळा अभिनेता साकारत आहे. तर अभिनेत्री तेजस्विनी पंडित देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. 


मराठमोळा देवदत्त गाजवतोय बॉलिवूड 
देवदत्त हा 'आदिपुरुष' चित्रपटात रामभक्त हनुमानाची भूमिका साकारत आहे. तसेच त्यानं तान्हाजी या हिंदी चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारली. देवदत्तनं अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं. जय मल्हार या मालिकेमुळे देवदत्तला विशेष लोकप्रियता मिळाली. डॉक्टर डॉन, देवयानी, बाजीराव मस्तानी या मालिकांमध्ये देवदत्तनं काम केलं. आता देवदत्तच्या आदिपुरुष या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


पाहा टीझर: 



आदिपुरुष या चित्रपटाच्या टीझरनं प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.  12 जानेवारी 2023 रोजी  IMAX आणि 3D मध्ये 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आदिपुरुष हा पौराणिक शैलीतील चित्रपट आहे हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याआधी ओम राऊतचा तान्हाजी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता आदिपुरुष या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.  


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: