Jacqueline Fernandez: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसला (Jacqueline Fernandez) 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) मोठा दिलासा मिळाला आहे. जॅकलिननं दिल्लीच्या (Delhi) पटियाला हाऊस कोर्टाकडे (Patiala House Court) दुबईला (Dubai) जाण्यासाठी परवानगी मागितली होती. आता कोर्टानं तिला दुबईला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. जॅकलिननं 27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान दुबईला जाण्यासाठी याचिका दाखल केली होती, जी मंजूर झाली आहे. पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी जॅकलिनला दुबईला जायचे आहे.


जॅकलिनने दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते की, तिला दुबईतील पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. रविवारी (29 जानेवारी) शेड्युल कॉन्सर्टमध्ये जॅकलिनला स्टार परफॉर्ममर म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. 






 200 कोटींच्या  सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून  जॅकलिन ही चर्चेत आहे. 15 नोव्हेंबर 2022 रोजी जॅकलिनला नियमित जामीन मिळाला.   


15 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी 


200 कोटी सुकेश चंद्रशेखर प्रकरणाच्या सुनावणीला पटियाला हाऊस कोर्टाने 23 जानेवारीला स्थगिती दिली. या खटल्यातील आरोपांवर न्यायालयात चर्चा होणार होती. मात्र, न्यायालयाने सुनावणी 15 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. त्याचवेळी न्यायालयाने जॅकलिनला वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 फेब्रुवारीला होणार आहे. 


जॅकलिनचे सुकेशवर गंभीर आरोप


जॅकलिन 18 जानेवारी रोजी कोर्टात हजर झाली होती. यावेळी जॅकलिननं 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर गंभीर आरोप केले होते. सुकेशनं माझं आयुष्य आणि करिअर बर्बाद केलंय, असंही जॅकलिननं कोर्टात सांगितलं. 


मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सुकेश चंद्रशेखर हा सध्या अटकेत आहे. सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याप्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले.


जॅकलीन ही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. सर्कस आणि रामसेतू हे तिचे चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. जॅकलिनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. 


महत्वाच्या इतर बातम्या:


Entertainment News Live Updates 27 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!