Deepti Naval Life Story :  सिनेसृष्टीतील कलाकारांचे झगमगतं आयुष्य सगळ्यांनाच दिसते. त्यांच्या स्टारडमची भुरळ अनेकांना पडते. मात्र, त्यातील काहींच्या वाटेला मात्र आव्हानात्मक काळ येतो. वाईट परिस्थितीशी सामना करतात. रुपेरी पडद्यावर आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री दीप्ती नवलच्या (Deepti Naval) आयुष्यात संकटांचा काळच आला. यातून त्या सावरल्या आणि  आयुष्यात रंग भरण्याचा प्रयत्न केला. 


दीप्ती नवल या 70-80 च्या दशकातील टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी आहे. त्यांनी चष्मे बद्दूर, कथा, साथ-साथ, अनकही, रंग बिरंगी, एक बार फिर, दामुल, कमला यासारख्या चित्रपटातील दीप्ती नवलच्या भूमिका गाजल्या. 


दोन वर्षातच मोडला संसार 


दीप्ती नवल यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1952 रोजी उदय सी नवल आणि त्यांची पत्नी हिमाद्री नवल यांच्या पोटी झाला. दीप्तीच्या वडिलांची इच्छा होती की तिने आपल्यासारखी चित्रकार व्हावी पण दीप्तीने अभिनयालाच करिअर म्हणून निवडले. दीप्तीच्या वडिलांना न्यूयॉर्कमधील विद्यापीठात नोकरी लागल्यावर सगळेजण न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले.  न्यूयॉर्कमध्ये 10 वर्ष राहिल्यानंतर दीप्ती नवलने भारतात आल्यानंतर सिनेइंडस्ट्रीतील प्रवासाला सुरुवात केली. 


सिनेसृष्टीत दीप्तीने प्रवासाला सुरुवात केल्यानंतर तिची ओळख चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासोबत ओळख झाली. या मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. 


दीप्ती नवल आणि प्रकाश झा हे दोघेही 1985 मध्ये विवाहबंधनात अडकले. दोघांनीही दिशा झा या मुलीला दत्तक घेतले आहे. पण दीप्ती आणि प्रकाश यांचे लग्न दोन वर्षांतच तुटले. दोघेही वेगळे राहत होते. या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या 15 वर्षानंतर 2002 मध्ये अधिकृतपणे घटस्फोट घेतला.  


प्रियकराचा कॅन्सरने मृत्यू 


प्रकाश झापासून विभक्त झाल्यानंतर दीप्तीच्या आयुष्यात प्रेमाने पुन्हा प्रवेश केला. ती अभिनेता विनोद पंडित यांच्या प्रेमात पडली. या दोघांनी त्यांच्या 'थोडा सा आसमान' या मालिकेत एकत्र काम केले होते. मात्र, दीप्ती नवलचा हा प्रेमाच्या मार्गावरील प्रवास अपूर्ण राहिला. विनोद पंडितचे कॅन्सरने निधन झाले.


विनोद पंडितसोबत का नाही केला विवाह?


पत्रकार सुभाष के झा यांना दिलेल्या मुलाखतीत दीप्तीने दिवंगत अभिनेते विनोद पंडित यांच्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. तिने म्हटले की, "विनोद पंडित यांच्यासोबतच्या माझ्या नात्यात मी पूर्णपणे गुंतले होते. कॅन्सरशी झुंज देत असतानाही त्यांनी तिला मोठा आधार दिला होता. तो तिच्या आयुष्यात आल्यानंतर माझे पहिले पेंटिग प्रदर्शन भरले होते.


त्यांनी मला पुन्हा फोटोग्राफी करायला आणि लेखनासाठी प्रोत्साहन दिलं. 'थोडा आसमान' या मालिकेत त्यांनी माझ्या पतीची भूमिका साकारली होती. विनोद आणि मी अनेकदा एकत्र प्रवास करायचो. आम्ही न्यूयॉर्कच्या टेकड्यांवर जायचो. थोडे पैसे कमावायचे, सुट्टीच्या दिवशी खर्च करायचे आणि मग परत यायचे. आम्ही बरीच वर्षे गुंतलो होतो. आम्हाला लग्नाची भीती वाटत होती, आमच्या नात्यातील रोमँटिकपणा संपू नये असे वाटत होते. 


दीप्ती नवल सध्या काय करतात?


 72 वर्षांच्या दीप्ती नवल ही सध्या एकाकी जीवन जगत आहे. ती तिच्या प्रियकराच्या नावाने ट्रस्टही चालवते. अभिनयातही ती सक्रिय आहे. नुकताच त्याचा 'गोल्डफिश' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याशिवाय तिच्या चित्रांचे प्रदर्शन ही आयोजित केले जातात. सोशल मीडियावरही दीप्ती सक्रिय आहे.