Mr And Mrs Mahi: अभिनेता राजकुमार राव (Janhvi Kapoor) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Rajkummar Rao) हे 'रुही' या चित्रपटानंतर पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. लवकरच त्यांचा 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr And Mrs Mahi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या ट्विटर अकाऊंटवरुन 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती पण आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. करण जोहरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे.
कधी रिलीज होणार 'मिस्टर अँड मिसेस माही'?
15 मार्च 2024 रोजी 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट रिलीज होणार असल्याची माहिती जुलै महिन्यामध्ये धर्मा प्रोडक्शनच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली होती. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी रिलीज केला जाणार आहे.
'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. शरण शर्मा यांनी 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटाच्या माध्यामातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता, झी स्टुडिओ यांनी केली आहे.
एप्रिल महिन्यामध्ये 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले होते. धर्मा प्रोडक्शनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली होती. आता 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटासोबत धोनीचं कनेक्शन असणार आहे का? या चित्रपटात आणखी कोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Mr And Mrs Mahi : माहीच्या आयुष्यावर पुन्हा एक चित्रपट; धोनीची भूमिका कोण साकारणार? चाहते उत्सुक