Bollywood Celebs Blessed With Baby Girl : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी चाहत्यांना गूड न्यूज आहे. दीपिका पादुकोणने रविवारी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कन्यारत्नाच्या स्वागतासह या कपलच्या आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. दीपिका-रणवीर यांच्याप्रमाणेच अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी घरी पहिल्या बाळाच्या रुपात लक्ष्मीचं स्वागत केलं आहे. अनेक सेलिब्रिटींनी पहिली मुलगी झाली आहे. या सेलिब्रिटींची यादी पाहा.






दीपिका-रणवीरप्रमाणे 'या' सेलिब्रिटींनाही आहे पहिली मुलगी


आलिया भट आणि रणबीर कपूर (Alia Bhatt Ranbir Kapoor)


आलिया भट आणि रणबीर कपूर यांना 2022 मध्ये कन्यारत्न झालं. आलिया आणि रणबीरची लेक राहा आता दीड वर्षांची आहे.


शाहिद कपूर-मीरा राजपूत (Shahid Kapoor and Mira Rajput)


अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांनाही पहिली मुलगी असून तिचं नाव मीशा आहे. मीशाचा जन्म ऑगस्ट 2016 मध्ये झाला.


अजय देवगण-काजोल (Ajay Devgn and Kajol)


अजय देवगण आणि काजोल यांच्या मुलीचं नाव न्यासा आहे. न्यासा देवगण आता 21 वर्षांची आहे.


संजय दत्त आणि मान्यता (Sanjay Dutt and Maanayata Dutt)


अभिनेता संजय दत्त यालाही पहिली मुलगी झाली. संजय दत्त आणि मान्यता दत्त यांच्या मोठ्या मुलीचं नाव त्रिशला दत्त (Trishala Dutt) आहे.


नेहा धुपिया आणि अंगद बेदी (Neha Dhupia and Angad Bedi)


मॉडेल-अभिनेत्री नेहा धुपियाने 2018 मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि तिचे नाव मेहर धुपिया बेदी असं आहे. 


सुनिल शेट्टी (Sunil Shetty)


अभिनेता सुनिल शेट्टी याचं पहिलं अपत्य मुलगी आहे. सुनिल शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी हिने क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केलं आहे.


कुणाल खेमू-सोहा अली खान (Kunal Khemu and Soha Ali Khan)


कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांना 2017 मध्ये पहिली मुलगी झाली, जिचं नाव इनाया आहे.


सैफ अली खान (Saif Ali Khan and Amrita Singh)


अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह आता वेगळे झाले आहेत. त्यांचं पहिलं अपत्य मुलगी सारा अली खान आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Deepika Padukone-Ranveer Singh : मुलगी झाली हो! दीपिका-रणवीर आई-बाबा झाले, चिमुकलीचं आगमन