Deepika Padukone-Ranveer Singh : अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिका-रणवीर आई-बाबा झाले आहेत. दीपिका पादुकोण आणि रणवीर दोन दिवस आधी सिद्धीविनायक मंदिरात दर्शनाला गेले होते, त्यानंतर शनिवारी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर आज दीपिका पादुकोणला मुलगी झाल्याची माहिती समोर आली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीबाबत बातम्या देणाऱ्या विरल भयानी याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर ही बातमी दिली आहे. 


दीपिका-रणवीर आई-बाबा झाले


दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं आमगन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात दीपिका पादुकोणनं गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे. ही गोड बातमी कळताच चाहत्यांकडून 'दीप-वीर'वर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहेत. चाहते कमेंट करत दीपिका आणि बाळासाठी शुभेच्छा देत आहेत.


दीपिका-रणवीरच्या घरी चिमुकलीचं आगमन


दीपिका आणि रणवीर शनिवारी लक्झरी कारमधून मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते, त्यामुळे चाहते बाळाची गोड न्यूज कधी कानी येईल, याची आतुरनेते वाट पाहत होते. यानंतर आज दीपिका-रणवीरला कन्यारत्न लाभलं आहे. दीपिकाने सध्या फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला असून ती तिचा पूर्ण वेळ बाळासाठी देणार आहे. 


मुलगी झाली हो!






बाळासाठी नाकारली मोठी इंटरनॅशनल ऑफर


अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं बाळासाठी मोठी इंटरनॅशनल ऑफर नाकारली आहे. दीपिका पादुकोणनं 'द व्हाईट लोटस' या इंटरनॅशनल वेब सीरिजची ऑफर नाकारली आहे. प्रेग्नेंसीनंतर दीपिका लगेचच कामावर परतणार नाही, तर बाळाची संगोपन करणार आहे. आपल्या बाळाची काळजी ती स्वतःच घेण्याचं ठरवलं आहे. नॅनीऐवजी दीपिका बाळाचा सांभाळ स्वत: करणार आहे. 


 


 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sexual Harassment : बॉडीगार्डकडूनच प्रसिद्ध अभिनेत्रीचा लैंगिक छळ; सौंदर्यवतीने खुलासा करत सांगितले, "तो वारंवार मागून..."