Gehraiyaan Trailer : दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र; ट्रेलर पाहिलात का?
Gehraiyaan Trailer : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi ) स्टारर चित्रपट ‘Gehraiyaan’चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चार प्रमुख व्यक्तिरेखा दिसल्या आहेत. या व्यक्तिरेखांचे आयुष्य एकमेकांत गुंतलेले आहे.
चित्रपटाचा ट्रेलर दमदार आहे. यात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यातील अनेक रोमँटिक सीन देखील दाखवण्यात आले होते.
दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे (Ananya Panday) आणि धैर्य करवा (Dhairya Karwa) व्यतिरिक्त या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Viacom18 Studios आणि Dharma Productions द्वारे Jawska Films च्या संयुक्त विद्यमाने निर्मित, या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.
भारतातील, तसेच जगातील 240 देशांतील दर्शकांना Amazon Prime Video वर या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. (all photo:deepikapadukone/ig)