December Release Movies: 2023 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. वर्षाचा शेवट अनेक जण पार्टी करुन, ट्रीपला जाऊन करतात. पण तुम्हाला जर वर्षाचा शेवट मनोरंजनात्मक करायचा असेल तर तुम्ही काही मराठी चित्रपट पाहू शकता. डिसेंबर महिन्यामध्ये काही मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल...


'लंडन मिसळ' (London Misal)


'लंडन मिसळ' (London Misal) हा चित्रपटयेत्या  8 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.भरत जाधव,ऋतुजा बागवे,रितिका श्रोत्री, गौरव मोरे आणि माधुरी पवार  या कलाकारांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन बहिणींची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. भारतात तसेच लंडनमध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे.






'बाजिंद' (Bajind)


8 डिसेंबर  रोजी 'बाजिंद' हा चित्रपट रिलीज होणार आहे.या चित्रपटात पूजा बिरारी आणि हंसराज जगताप हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हंसराज आणि पूजा या नव्या कोऱ्या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री  तुम्हाला 'बाजिंद'  या चित्रपटात बघायला मिळणार आहे.  शर्वणी पिल्लई, सिद्धेश्वर झाडबुके, अनिल नगरकर, माधुरी पवार, उषा नाईक, प्रेमा किरण, ओंकार भोसले, प्रियंका राठोड  या कलाकारांनी देखील या चित्रपटात काम केलं आहे.


 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) 


'एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट देखील 8 डिसेंबर  रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात तगडी स्टार कास्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने हे कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. तसेच  सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार या कलाकारांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. 






संबंधित बातम्या:


London Misal: दोन बहिणींची भन्नाट गोष्ट; 'लंडन मिसळ'चा टीझर रिलीज, ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत