December 2024 Upcoming Box Office Hits: डिसेंबर 2024 (December 2024) मध्ये काही धमाकेदार चित्रपट सिनेप्रेमींच्या मनोरंजनासाठी येत आहेत. वर्षाचा शेवटचा महिना असला, तरी अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) येणार आहेत. या चित्रपटांची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत आहेत. जाणून घेऊयात बॉक्स-ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी कोणते चित्रपट येणार? त्याबाबत...
पुष्पा 2 (Pushpa 2 The Rule) - 5 डिसेंबर
प्रत्येकजण पुष्पाचा सिक्वेल Pushpa 2 ची वाट पाहत आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट फक्त साऊथमध्येच नाहीतर भारत आणि जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतला. आता येत्या 5 डिसेंबरला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत.
वनवास (Vanvaas) - 20 डिसेंबर
प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. Vanvaas च्या कथा आणि कलाकारांकडून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा आहेत.
मुफासा : द लायन किंग (Mufasa : The Lion King) - 20 डिसेंबर
डिज्नीचा प्रसिद्ध चित्रपट The Lion King चाच एक भाग असलेला Mufasa ही डिसेंबरमध्ये रिलीज होत आहे. हा चित्रपच खासकरुन मुलं आणि कुटुंबासाठी एक खास अनुभव आहे.
बेबी जॉन (Baby John) - 25 डिसेंबर
वरुण धवनचा चित्रपट Baby John, 25 डिसेंबर रोजी रिलीज केला जाणार आहे. हा एक अॅक्शन-थ्रीलर चित्रपट आहे. जो प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल डोस ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :