December 2023 Movies : 2023 हे वर्ष सिनेसृष्टीसाठी खूपच खास होतं. वर्षाच्या सुरुवातीलाच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. तसेच 'गदर 2' (Gadar 2),'जेलर' (Jailer),'जवान' (Jawan) आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता वर्षाचा शेवटही मनोरंजनमय होणार आहे. अनेक सुपरस्टार्सचे बिग बजेट सिनेमे या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. 


शाहरुख खान (Shah Rukh Khan) : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'डंकी' (Dunky) हा सिनेमा डिसेंबर 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. किंग खानच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.






जेसन मोमोआ (Jason Momoa) : हॉलिवूड सुपरस्टार जेसन मोमोआ डिसेंबरमध्ये बॉक्स ऑफिस गाजवणार आहे. जेसनचा 'एक्वामैन 2' हा सिनेमा 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


धनुष (Dhanush) : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या आगामी 'कॅप्टन मिलर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमादेखील 15 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. धनुषचा हा पहिलाच पॅन इंडिया सिनेमा आहे. 






मोहनलाल (Mohanlal) : दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल सध्या त्याच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहे. डिसेंबर 2023 मध्ये मोहनलालचा एक सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तो कोणता सिनेमा असेल हे अद्याप समोर आलेलं नाही. 


प्रभास (Prabhas) : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा बहुचर्चित 'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षाच्या शेवटी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा सिनेमा तेलुगू, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या


Jawan Vs Salaar : शाहरुख खान अन् प्रभास आमने-सामने; 'जवान'पेक्षा 'सालार'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सर्वाधिक