OTT Release October 2023 : सिनेप्रेक्षकांसाठी ऑक्टोबर (October) महिना खूप खास आहे. या महिन्यात अनेक दर्जेदार सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. खुशी (Khushi), स्पायडर मॅन : अक्रॉस दी स्पाइडर वर्स (Spider man), हरकारा आणि बेबाक पर्यंत अनेक सिनेमांचा आणि वेबसीरिजचा समावेश आहे. 


खुशी (Kushi) : 
कधी होणार रिलीज? 1 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स


विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू यांचा 'खुशी' हा रोमँटिक सिनेमा आहे. 1 ऑक्टोबरला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. 


स्पायडर मॅन : अक्रॉस द स्पायडर : (Spider Man : Across The Spider Verse)
कधी होणार रिलीज? 1 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स


'स्पायडर मॅन : अक्रॉस द स्पायडर' हा एक रोमांचक सिनेमा आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेरसिक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्सवर पाहू शकतात. 


हरकारा (Harkara)
कधी होणार रिलीज? 1 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म - प्राइम व्हिडीओ


'हरकारा' हा सिनेमा प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. राम अरुण कास्त्रो यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात काली वेंकट, पिचाईक्करन मूर्ती आणि गौतमी चौधरी मुख्य भूमिकेत आहेत. 


बेबाक (Bebak)
कधी होणार रिलीज? 1 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म - जिओ सिनेमा


'बेबाक' हा सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. शाजिया जाहीद इकबाल यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सारा हाशमी, नवाजुद्दीन सिद्दीकी, विपिन शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. 


रॅट इन दी किचन (Rat in The Kitchen)
कधी होणार रिलीज? 2 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म - जिओ सिनेमा


खुफिया (Khufiya)
कधी होणार रिलीज? 5 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स


विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'खुफिया' हा थरार नाट्य असणारा सिनेमा आहे. तब्बू, आशीष विद्यार्थी, अली फजल या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


'गदर 2' (Gadar 2)
कधी होणार रिलीज? 6 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म - झी 5


'गदर 2' हा सिनेमा 6 ऑक्टोबरला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


मुंबई डायरीज सीझन 2
कधी होणार रिलीज? 6 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म - अॅमेझॉन प्राइम 


'मुंबई डायरीज सीझन 2' ही सीरिज 6 ऑक्टोबरला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये मोहित रैन, टीना देसाई, श्रिया, सत्यजीत दुबे, कोंकणा सेन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


काला पानी (Kaala Paani)
कधी होणार रिलीज? 18 ऑक्टोबर
प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स


'काला पानी' या सीरिजचं दिग्दर्शन समीर सक्सेना आणि अमित गोलानी यांनी केलं आहे. या सीरिजमध्ये आशुतोष गोवरिकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 18 ऑक्टोबरला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संबंधित बातम्या


OTT Release This Week : 'हॉस्टल डेज सीझन 4' ते 'किंग ऑफ कोठा'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी