Daya Nayak in Salman Khan House Firing Case: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबारानंतर बॉलीवूडसह संपूर्ण देश हादरला. या गोळीबाराचं कनेक्शन थेट बिष्णोई गँगसोबत लावण्यात आलं. त्यानंतर त्याचे अनेक दाखलेही समोर आले. रविवार 14 एप्रिल रोजी सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर 48 तासांत यातील आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणात आता एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक (Daya Nayak) यांची एन्ट्री झाली आहे. 


विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना या प्रकरणात 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण सध्या या प्रकरणाचा तपास हा एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक करत असल्याचं समोर आलं आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात गुजरातमध्ये पोलिसांना महत्त्वाची लीड हाती लागल्याची माहिती देण्यात येतेय. त्यामुळे आता या प्रकरणात कोणतं गुजरात कनेक्शन सापडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


दया नायकांकडे प्रकरणाचा तपास


सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करण्यासाठी सध्या मुंबई गुन्हे शाखेची एक टीम गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये या हल्ल्यात आरोपींनी वापरलेल्या पिस्तुलाचा शोध सुरु आहे. या गुन्हे शाखेच्या युनिट 9चे इंजार्ज दया नायक हे देखील आहेत. ते सुद्धा संपूर्ण टीमसोबत सध्या सूरतमध्ये आहेत. आरोपींनी हे पिस्तुल सुरतमधील एका नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सुरतमधल्या तापी नदीत पिस्तुलाचा शोध सुरु आहे. 


सलमानच्या घरात गोळी


या गोळीबारातील एक गोळी सलमान खानच्या घरात घुसली असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने गॅलरीमध्ये कुणी नव्हतं, गॅलरी रिकामी होती. पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातील एक गोळी गॅलरीतील पडद्यातून  आरपार गेली आणि भिंतीवर लागली असल्याचे समोर आले. 


गोळीबाराचा संबंध बिश्नोई गँगशी


गोळीबाराचा लॉरेन बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंध आहे. याआधी देखील बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात काळविटांना देवासमान मानले जाते.  1998 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच लॉरेन्सकडून सलमान खान धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता, घराजवळ गोळीबार झाला. 


ही बातमी वाचा : 


Chinmay Mandlekar : 'असल्या ट्रोलर्सवर कडक कारवाई...', प्रसिद्ध दिग्दर्शकाने चिन्मयसाठी महाराष्ट्र सरकारकडे केली विशेष मागणी