Maharashtrachi Hasyajatra Fame Dattu More Love Story : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने अनेक नवोदीत कलाकारांना संधी दिली आहे. अभिनेता दत्तू मोरेदेखील (Dattu More) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तेव्हापासून त्याची लव्हस्टोरी जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


दत्तू मोरेने संसाराची सुरुवात केली असून त्याच्या पत्नीचं नाव स्वाती घुनागे आहे. त्याची पत्नी स्वाती ही पुणेकर असून डॉक्टर आहे. तसेच तिचं स्वत:चं एक क्लिनिक आहे. नुकतचं एका मुलाखतीत दत्तूने त्याच्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य केलं आहे. 


दत्तू मोरेची 'प्यारवाली लव्हस्टोरी' जाणून घ्या... (Dattu More Love Story)


दत्तू मोरे आणि स्वाती चार-पाच वर्षापूर्वी एका कॉमन मित्राच्या मार्फत पुण्यात भेटले होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली. पुढे फेसबुकच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात स्वातीने दत्तूला पाहिलं आणि मेसेज केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने ते एकमेकांच्या संपर्कात आले. 


दत्तू आणि स्वाती एकमेकांच्या संपर्कात आले तेव्हा तिचं एमएस पूर्ण झालं होतं. एकीकडे ती तिच्या कामात व्यस्त होती. तर दुसरीकडे दत्तू 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचं शूटिंग करत होता. पण कामाच्या व्यस्त वेळापत्रकातही दत्तू आणि स्वाती एकमेकांसोबत जोडले गेले. 




दत्तूबद्दल बोलताना स्वाती म्हणाली,"दत्तूचा स्वभाव मला खूप आवडला होता. मला जसा जोडीदार हवा होता अगदी तसाच दत्तू होता. दत्तू एक प्रामाणिक माणूस आहे. त्याचं कामावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे कामाबद्दल आमचं अधिक बोलणं वाढलं. पुढे एकमेकांच्या आवडी-निवडी शेअर करताना मी त्याच्या प्रेमात पडले". 


दत्तू म्हणाला,"स्वातीला मी आवडत असूनही त्याबद्दल ती बोलत नव्हती. मेसेज करायची आणि डिलीट करायची. त्यावरुण मला थोडासा अंदाज आला होता. आम्ही कामात व्यस्त असूनही पहाटे चार-साडे चारपर्यंत एकमेकांसोबत बोलत असायचो. पुढे आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आहोत याची जाणीव झाली. 


डॉक्टर स्वातीने पटवलंय दत्तूला


स्वातीने दत्तूला लग्नासाठी विचारणा केली. पण दत्तूने तिला लगेचच तिला होकार दिला नाही. वैयक्तिक आयुष्यातील काही कारणांमुळे दत्तूला लगेचच लग्न करायचं नव्हतं. पुढे एक ते दोन वर्षांनी दत्तूने स्वातीला होकार दिला आणि लगेचच 23 मे 2023 रोजी दत्तू आणि स्वाती लग्नबंधनात अडकले.  


संबंधित बातम्या


Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरे अडकला विवाह बंधनात; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो