Actor Suhani Bhatnagar Passes Away : 'दंगल' (Dagal) चित्रपटामध्ये आमिर खानसोबत (Aamir Khan) काम करणाऱ्या अभिनेत्रीचं अवघ्या 19 व्या वर्षी निधन झालं आहे. बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपट दंगल चित्रपटातील (Dangal Movie) छोट्या बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचं (Suhani Bhatnagar) निधन झालं आहे. स्किन संबंधित गंभीर आजारामुळे सुहानी भटनागरचं निधन झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. या रोगाची लक्षणे अत्यंत साधारण असतात, पण ही लक्षण जीवघेणी ठरू शकतात. सुहानी भटनागर डर्मेटोमायोसाइटिस (dermatomyositis) या आजाराने ग्रस्त होती. डर्मेटोमायोसाइटिस आजार म्हणजे नेमका काय आणि याची लक्षणे जाणून घ्या.


दंगल' फेम अभिनेत्रीचं वयाच्या 19 व्या वर्षी निधन


डर्मेटोमायोसाइटिस (Dermatomyositis) त्वचेसंबंधित आजार आहे. सुरुवातीला या रोगाची लक्षणे अतिशय साधी असतात, पण हा आजार अत्यंत गंभीर रुप घेऊ शकतो. 11 दिवसांआधीच सुहानीची तब्येत बिघडल्याने तिला एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान केलेल्या चाचणीमध्ये सुहानीला डर्मेटोमायोसाइटिस (Dermatomyositis) हा आजार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.




डर्मेटोमायोसाइटिस आजार काय आहे?  ( What Is Dermatomyositis )


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डर्मेटोमायोसाइटिस (Dermatomyositis) हा अतिशय दुर्मिळ त्वचा रोग आहे. या रोग पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. या आजारामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते. या आजारात शरीर आता रोगांशी लढण्यास सक्षम राहत नाही. स्टिरॉइड्स हाच त्याचा उपचार आहे, पण यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर आणखी परिणाम होण्याचा धोका असतो. डर्मेटोमायोसाइटिस आजारात पेशींमध्ये जळजळ होते, ज्यामुळे स्नायू झपाट्याने कमकुवत होऊ लागतात आणि त्वचेवर पुरळ उठते.


डर्माटोमायोसिटिसची लक्षणे


डर्माटोमायोसिटिस या आजाराची लक्षणे खूप उशीरा दिसून येतात. तसेच, अचानक या आजाराची लक्षणे दिसू शकतात. या गंभीर आजाराचे सुरुवातीचे लक्षण त्वचेतील बदल आहे. याचे पहिले लक्षण म्हणजे त्वचा निळ्या-जांभळ्या किंवा डस्की रंगात बदलू लागते. त्यामुळे त्वचेवर रॅशेस दिसू लागतात. हे पुरळ सहसा चेहऱ्यावर आणि डोळ्याभोवती दिसतात. रॅशेसमुळे खाज आणि वेदना होतात.


याची कारणे काय?


डर्माटोमायोसिटिस आजाराची नेमकी कारणे कोणती याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही. पण हा आजार ऑटोइम्यून डिसऑर्डरसारखाच आहे. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चुकून त्याच्या निरोगी ऊतींवर हल्ला करू लागते. अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक जसे की विषाणू संसर्ग, तीव्र सूर्यप्रकाश, काही औषधे आणि धूम्रपान हे देखील यामध्ये भूमिका बजावतात.