Dada Saheb Phalke Award 2021: दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत  यांच्या मृत्यूला 8 महिने उलटून गेली. परंतु फॅन्स अद्याप त्याला विसरु शकले नाहीत. सुशांतचे चाहते सोशल मीडियावर अनेकदा त्याची आठवण काढतात. अशातच सुशांतच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आली आहे. सुशांतसिंह राजपूतला यंदाचा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.


दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्काराचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेकांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांतला क्रिटिक्स बेस्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आलं. सुशांतला हा पुरस्कार त्याच्या शेवटच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटासाठी देण्यात आला होता. दादासाहेब फाळके म्हणजेच डीपीआयएफएफने सोशल मीडियावर ही माहिती दिली. डीपीआयएफएफने इंस्टाग्राम अकाउंटवर सुशांतसिंग राजपूत याचा फोटो शेअर केला होता. त्यावर लिहिले की "क्रिटिक्स बेस्ट अॅक्टर... दिवंगत सुशांतसिंह राजपूत (1986-2020)." सुशांतचे चाहते या सन्मानाने आनंदी आहेत. यावेळी सुशांतचे चाहते भावूकही झाले. चाहत्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या आठवणी शेअर केल्या.


 कुटुंबीय, चाहत्यांकडून सुशांतच्या आठवणींना उजाळा, सीबीआय अद्यापही निष्कर्षाविना


'काय पो चे' या चित्रपटाद्वारे पदार्पण


सुशांतने 'काय पो चे' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर, त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या कारकीर्दीत त्यांनी एमएस धोनी, केदारनाथ, छिचोरे', शुद्ध देसी रोमान्स इत्याही सिनेमांमध्ये काम केलं. दिल बेचारा हा सुशांतचा अखेरचा चित्रपट ठरला.


SSR Birthday: सुशांतच्या जन्मदिनी कंगनाने समजावली त्याच्या मृत्यूची क्रोनोलॉजी


सुशांत 14 जून रोजी मुंबईतील घरात मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतने फाशी घेत आत्महत्या केली. सुशांतच्या अशा जाण्याने अनेकांना धक्का बसला. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या आणि आजही सुरुच आहेत.


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील 'मीडिया ट्रायल'वर हायकोर्टाचे ताशेरे