Criminal Justice 3 : ओटीटी (Ott) विश्वात पंकज त्रिपाठीचे (Pankaj Tripathi) नाव आदराने घेतले जाते. अनेक लोकप्रिय वेबसीरिजमध्ये पंकजने काम केलं आहे. पंकजची 'क्रिमिनल जस्टिस' (Criminal Justice) ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. आता या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


'क्रिमिनल जस्टिस 3'चा ट्रेलर डिज्नी प्लस हॉटस्टारने युट्यूब आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये माधव मिश्रा एक खटला लढवताना दिसत आहे. मुकुलवर त्याच्याच बहिणीची हत्या केल्याचा आरोप आहे. सर्व पुरावे मुकुलच्या विरोधात आहेत. त्यामुळे पंकज आता हे प्रकरण कसे लढवतात हे प्रेक्षकांना 'क्रिमिनल जस्टिस 3' मध्ये पाहायला मिळणार आहे.


'क्रिमिनल जस्टिस 3' या वेबसीरिजमध्ये पंकज त्रिपाठीसह श्वेता बसू प्रसाद, स्वस्तिका मुखर्जी, पूरब कोहली, आदित्य गुप्ता, देशना दुगड आणि गौरव गेरा देखील दिसणार आहेत. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षक आता वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर 26 ऑगस्टपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 






'क्रिमिनल जस्टिस 3' डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार रिलीज


'क्रिमिनल जस्टिस 3'च्या ट्रेलरला अल्पावधीतच हजारो लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावरदेखील ही वेबसीरिज चर्चेत आहे. ट्रेलर आऊट झालेला असला तरी ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हे निर्मात्यांनी जाहीर केलेलं नाही. पुढल्या महिन्यात डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही वेबसीरिज रिलीज होणार आहे. 


'क्रिमिनल जस्टिस 3'चा एक टीझर याआधीदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरमुळे प्रेक्षकांना माधव मिश्राची झलक पाहायला मिळली होती. टीझरमध्ये पंकज म्हणजेच माधव म्हणाला होता,माझं नाव माधव मिश्रा आहे आणि मी वकील आहे". 'क्रिमिनल जस्टिस 3' ही सीरिज प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार आहे. 


संबंधित बातम्या


Criminal Justice 3 Teaser : विजय नेहमी सत्याचाच होतो... पंकज त्रिपाठीच्या 'क्रिमिनल जस्टिस 3'चा टीझर आऊट


Criminal Justice Season 3 : माधव मिश्रा परत येतोय; 'क्रिमिनल जस्टिस'च्या तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज