Spider Man : स्पायडर मॅनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्पायडर मॅनला (Spider Man) आता 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. स्पायडर मॅनचा मोठा चाहतावर्ग आहे. स्पायडर मॅनच्या पुस्तकांनी, सिनेमांनी 60 वर्षांचा टप्पा पार केला आहे. 1970 साली स्पायडर मॅन चाहत्यांच्या भेटीला आला. 


स्पायडर मॅनचे खास वैशिष्य आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्व वयोगटातील मंडळी स्पायडर मॅनचे चाहते आहेत. स्पायडर-मॅनचे कॉमिक्स आजही जगभरात आवडीने वाचले जाते. 60 वर्षांपूर्वी कथासंग्रहांमधून स्पायडर मॅनचा सुरू झालेला प्रवास पुढे भव्य-दिव्य, ग्राफिक्स, तंत्रज्ञान, अॅनिमेशनच्या माध्यमातून सिनेरसिकांच्या भेटीला आला. त्यामुळे स्पायडर मॅनचे सिनेमे पाहालया सिनेरसिक मोठ्या प्रमाणात सिनेमागृहात जातात. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'स्पायडर मॅन - नो वे होम' हे याचे ताजे उदाहरण आहे. या सिनेमाने जगभरात अनेक रेकॉर्ड केले आहेत. 


स्पायडर मॅन या पात्राचा लाल- निळ्या रंगाचा क्लासिक पोशाख चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. स्पायडर मॅनला सुपरहिरो म्हटले जाते. स्पायडर मॅन हा सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण सुपरहिरो मानला जातो. स्पायडर मॅन या पात्राकडे एक वेगळीच शक्की असल्याने लहान मुलांना ते आकर्षित करते. पण स्पायडर मॅनवर कथा लिहिणारे लेखक लिपटार म्हणतात, स्पायडर मॅनच्या चाहत्यांनी स्पायडर मॅनसारखे कपडे परिधान करणे योग्य नाही". 






'स्पाइडरमॅन : नो वे होम' ठरला जगातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा


'स्पाइडरमॅन : नो वे होम' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणारा हा सहावा चित्रपट ठरला आहे. सिनेमाने आतापर्यंत 1.69 अब्ज कमाई केली आहे. 'ज्युरासिक वर्ल्ड' आणि 'द लायन किंग' सिनेमालादेखील 'स्पाइडरमॅन : नो वे होम'ने मागे टाकले आहे. 'ज्युरासिक वर्ल्ड'ने 1.67 अब्ज कमाई केली होती तर 'द लायन किंग'ने 1.66 अब्ज कमाई केली होती. टॉम हॉलंडच्या 'स्पायडरमॅन: नो वे होम' सिनेमाने अनेक बड्या सिनेमांना मागे टाकले असून जगातील सर्वाधिक कमाई करणारा सहाव्या क्रमांकाचा सिनेमा ठरला आहे. 


संबंधित बातम्या


Spider Man : बॉक्स ऑफिसवर 'स्पायडर मॅन'चा धुमाकूळ, चार दिवसात 100 कोटी क्लबमध्ये दाखल


Premiere of Spider-Man No Way Home : स्पायडर मॅनच्या प्रीमियरनंतर Tom Holland भावूक; व्हिडीओ व्हायरल