Laal Singh Chaddha : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) यांचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. आमिर आणि करीना आपल्या टीमसोबत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, आता ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाची गाणी एकामागोमाग एक रिलीज होत आहेत. नुकतेच या चित्रपटातील ‘तेरे हवाले’ (Tere Hawaale) हे गाणे रिलीज झाले. हे गाणे अरिजित सिंहने (Arijit Singh) गायले आहे. या गाण्यात करीना कपूर आणि आमिर खान रोमान्स करताना दिसले आहेत.


सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेले हे गाणे चाहत्यांना खूप आवडले आहे. 'तेरे हवाले' हे नवीन गाणे एक रोमँटिक गाणे आहे, जे ऐकून चाहते देखील त्यांच्या प्रेमाच्या आठवणीत हरवून जातील. हे गाणे अरिजित सिंह आणि शिल्पा राव यांनी गायले आहे. तर, त्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. प्रीतमने या गाण्याला संगीत दिले आहे.


पाहा गाणे :



‘तेरे हवाले’ हे ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातील पाचवे गाणे आहे. यापूर्वी ‘कहानी’, ‘मैं की करा’, ‘फिर ना ऐसी रात आएगी’ आणि ‘तूर कलियां’ ही चार गाणी रिलीज झाली आहेत. निर्मात्यांनी याआधी सर्व गाण्यांचे ऑडिओ व्हर्जन रिलीज केले होते. मात्र, या गाण्याचा केवळ ऑडिओ रिलीज करण्यात आला आहे.


कलाकार आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी


‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हॉलिवूडमधील ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटामध्ये अभिनेता टॉम हँक्स यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ला बायकॉट करण्याची मागणी लोक आमिरच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे केली जात आहे. नेटकऱ्यांचे असे मतं आहे की, आमिर याआधी भारतीय संस्कृती आणि सभ्यतेबद्दल बरंच काही बोलला आहे, त्यामुळे त्याचे चित्रपट भारतात प्रदर्शितच होऊ नयेत. एकदा आमिर खान देश असहिष्णू झाला आहे, असे म्हटला होता.


करीना देखील होतेय ट्रोल


आमिरसोबतच लोक करीनाला देखील ट्रोल करत आहेत. एका मुलाखतीमध्ये करीनाने म्हटले होते की, लोकांनी आम्हाला स्टार बनवले आहे आणि आम्ही कोणावरही आमचे चित्रपट पाहण्याची सक्ती केलेली नाही. मी स्वतः चित्रपट पाहत नाही. करीनानं केलेल्या या वक्तव्यामुळे लोक आता 'लाल सिंह चड्ढा'ला ट्रोल करत आहेत. आमिर आणि करीनाशिवाय ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामध्ये मोना सिंह, नागा चैतन्य हे देखील या प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.


संबंधित बातम्या : 


Laal Singh Chaddha Boycott : सिनेमा चांगला असेल तर काय कराल? बहिष्कार घालणाऱ्यांना करीनाचा सवाल


Laal Singh Chaddha : कंगना म्हणाली, 'हे आमिरच करतोय'; 'बायकॉट लाला सिंह चड्ढा' बद्दल शेअर केली पोस्ट