‘विचारल्याबद्दल धन्यवाद. काजोल आणि न्यासा एकदम ठीक आहे. त्याच्या तब्येतीच्या सर्व अफवा खोट्या आहेत’ अशा प्रकारचं ट्वीट अजयने केलं आहे.
दरम्यान न्यूजट्रॅकच्या माहितीनुसार, ‘कोरोनाची लक्षण दिसल्यामुळे अजय देवगण आणि काजोल मुलगी न्यासाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यानंतर न्यासाच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. ज्यात मुलगी न्यासाला कोरोना झाल्याचं समोर आलं’. हा दावा फेटाळत अजय देवगणने पत्नी काजोल आणि न्यासा कोरोनापासून सुरक्षित असल्याचं मीडियाच्या माध्यमातून सांगितलं.
अजय आणि काजोलची मुलगी न्यासा नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अजय देवगण तिला बचाव करण्यासाठी पुढे येत असतो. 18 मार्चला काजोल व तिची मुलगी न्यासा एअरपोर्टवर दिसल्याची देखील चर्चा होती.
अजय देवगण आपल्याला त्याच्या आगामी ‘सुर्यवंशी’ या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 24 मार्चला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. या आधी अजय देवगणच्या तानाजी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.
Coronavirus | Kanika Kapoor | कनिका कपूरमुळे कोरोना संसदेत पोहोचला?