Sukesh ChandraShekhar : सुकेश चंद्रशेखर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) सोबत  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव (Jacqueline Fernandez) जोडले जात  होते. त्यानंतर जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. पण आता याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. 


सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर (bhumi Pednekar), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) सारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. काही अभिनेत्रींनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला तर काहींनी नाकारल्या होत्या.  


अंमलबजावणी संचालनालयच्या अधिकाऱ्यांनी  दिलेल्या माहितीनुसार, पिंकी इराणी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिन फर्नांडिसोबत ओळख करून दिली होती. जॅकलिनसोबत ओळख करून देण्यासाठी  पिंकीने सुकेशकडून मोठी रक्कम घेतली होती. 


सुकेशने जॅकलीनला गिफ्ट म्हणून दिली होती बरीच महागडी जनावरं
सुकेश चंद्रशेखर या उद्योहपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश होता. ही सर्व माहिती ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली होती. पण आता जॅकलीनसह आणखी काही अभिनेत्रींनादेखील महागड्या भेटवस्तू दिल्याचे समोर आले आहे. 


संबंधित बातम्या


Gangubai Kathiawadi : गंगुबाई काठियावाडी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा


Mahesh Manjrekar : 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' सिनेमामुळे महेश मांजरेकरांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल


Jhund Trailer : बिग बींचा स्वॅग, आकाशचा लफडा.. 'झुंड'चा ट्रेलर लॉंच


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha