Gangubai Kathiawadi : आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सिनेमा सध्या चर्चेत आहे. पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.  चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत त्याविरोधात दोन स्वतंत्र याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. पण आता सिनेमासंबंधित मोठी अपडेट आली आहे. 


कोणत्याही बदलाविना 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा प्रदर्शित करण्यास संजय लीला भंसाळींना (Sanjay Leela Bhansali) हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. 


कॉंग्रेस आमदार अमीन पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. तसेच कामाठीपुरातील स्थानिक रहिवाश्यांनीदेखील मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत. 


'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात आलेल्या 'काठियावाडी', 'कामाठीपुरा' आणि 'चायना' या उल्लेखांवर आक्षेप घेत याचिका दाखल झाल्या होत्या. पण आता आलिया भट्ट् आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा येत्या 25 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 


'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाची कथा काय आहे?
आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा बायोग्राफिकल ड्रामा आहे. आलिया भट्ट या चित्रपटात 'गंगूबाई'ची भूमिका साकारत आहे. गंगूबाईला तिच्याच नवऱ्याने 500 रुपयांना विकले होते. या चित्रपटाची कथा लेखक हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. गंगूबाईंच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूला स्पर्श करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. एक सामान्य मुलगी कामाठीपुराची क्वीन कशी बनते, हे सर्व या सिनेमात पाहायला मिळेल.


संबंधित बातम्या


Gangubai Kathiawadi : आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाविरोधात आमदार आणि स्थानिक हायकोर्टात


Mahesh Manjrekar : 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' सिनेमामुळे महेश मांजरेकरांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल


Gangubai Kathiawadi : ...म्हणून 'गंगूबाई'च्या प्रमोशनसाठी आलिया नेसते पांढरी साडी ; कारण माहितीये?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha