Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांचे कुटुंबीय चाहत्यांना सातत्याने माहिती देत आहेत. दरम्यान, कॉमेडियन आणि राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र सुनील पाल (Sunil Pal) यांनी राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे सध्या एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून, व्हेंटिलेटरवर आहेत. अद्याप त्यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झालेली नाही. गेल्या आठवड्यात राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
दरम्यान, अभिनेते सुनील पाल यांनी एक व्हिडीओ शेअयार करत राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. ते म्हणाले, 11 डॉक्टरांचे पथक राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करत असून, ते हळूहळू बरे होत आहेत.
काय म्हणाले सुनील पाल?
या व्हिडीओमध्ये सुनील पाल म्हणत आहेत की,'नमस्कार मित्रांनो, मी सुनील पाल. आपणा सर्वांनाच माहीत आहे की, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल आपण सर्वजण चिंतेत आहोत. त्याच्याबद्दल अनेक बातम्या आणि अफवा येत आहेत. मला त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेली ताजी बातमी म्हणजे देवाच्या कृपेने ते बरे होत आहेत. रिकव्हरी थोडी कमी आहे, पण आता ते बरे होत आहेत.’
पाहा व्हिडीओ :
ते पुढे म्हणाले की, 'तुम्हा सर्वांना विनंती आहे की, आमचा कॉमेडी किंग ज्याने या जगाला, प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबाला खूप हसवले, त्याच्यासाठी प्रार्थना करा. जो सदैव हसत राहिला, अशा महान कलाकाराने लवकर बरे व्हावे, यासाठी तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. हसणे हे सर्वोत्तम औषध आहे, हे आता सिद्ध करावे लागेल. राजूभाई लवकर बरे व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.’
कुटुंबाने चाहत्यांना केले आवाहन
राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनीही एक निवेदन शेअर केले आणि लोकांना त्याच्या मृत्यूच्या अफवा पसरवू नका, असे आवाहन केले आहे. राजू यांच्या कुटुंबाने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'राजू श्रीवास्तवजींची प्रकृती स्थिर आहे. आम्ही ते लवकरात लवकर बरे व्हावेत, म्हणून प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.’
तब्येतीत काहीशी सुधारणा!
10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांना दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, मात्र अलीकडेच राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याचे माहिती समोर आली आहे. राजू आता उपचारांना प्रतिसाद देत असून, त्यांना नळीद्वारे लिक्विड देण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कॉमेडियनला शुद्धीवर येण्यासाठी काही दिवस लागू शकतात.
महत्वाच्या बातम्या :