Cobra Trailer : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चियान विक्रम (Chiyaan vikram) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा कोब्रा हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात चियान विक्रम हा एक नाही दोन नाही तर तब्बल 25 भूमिका साकारणार आहे. 'कोब्रा' या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन, थ्रिलर स्टोरी आणि ड्रामा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील विक्रमच्या वेगवेगळ्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


'कोब्रा'ची तगडी स्टार कास्ट
माजी क्रिकेटपटू इरफान पठाण या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या चित्रपटात चियान विक्रमसोबतच अभिनेत्री श्रीनिधि शेट्टी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्याच बरोबर मिया जॉर्ज, रोशन मॅथ्यू, सरजानो खालिद, पद्मप्रिया, मोहम्मद अली बेग, कनिहा, मिरनालिनी रवि, मीनाक्षी आणि के.एस. रविकुमार हे कलाकार देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 31 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. आर. अजय. ज्ञानमुथु यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर सेव्हेन स्क्रीन स्टुडिओनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हरीश कन्नन यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. 


पाहा ट्रेलर: 



चियान विक्रमचे आगामी चित्रपट 
कोब्रा बरोबरच चियान विक्रम चा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, कार्थी, जयम रवि, तृषा, प्रकाश राज आणि शोभिता धूलिपाला हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. प्रेक्षक विक्रमच्या आगमी चित्रपटांची वाट उत्सुकतेने बघत आहेत. चियान विक्रमच्या अन्नियान,ढोल, सामी, पिठमागन या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अन्नियान या चित्रपटातील विक्रमच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: